Alleged distribution of cash and household items to influence voters during municipal elections, raising serious questions over the state of democracy. Saam Tv
महाराष्ट्र

लोकशाहीची लक्तरं, मतदानाची दुकानं, महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, वॉशिंग मशिन, मिक्सर,चांदीचं वाटप

From Cash To Washing Machines: महापालिका निवडणुकीत लोकशाहीची लक्तरं वेशीला टांगणारे नवनवे फंडे समोर आलेत.. हे फंडे काय आहेत.. आणि कशा पद्धतीने मतदारांचा सौदा केला जातोय..

Bharat Mohalkar

चांदीच्या वाट्या आणि चमचे, वॉशिंग मशीन, मिक्सर हे सगळं बघितल्यावर तुम्हाला वाटेल हा एखादा सेल आहे की काय.. हो हा सेलच आहे , महापालिका निवडणूकांमधल्या मतदार खरेदीचा .... लोकशाहीची लक्तरं वेशीला टांगणारा ...

पैशांनी मतं नाही तर मतदारांचा स्वाभिमान विकत घेतला जातोय.. यातून मतदार राजा नाही तर गुलाम बनत असून उमेदवारांनी मतदार खरेदीचा बाजार मांडला आहे . यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अडते झालेत .या सौदेबाजीचे नवनवे फंडेही समोर येत आहेत.... ही दृश्ये पाहा... मतदारांना चांदीच्या वाट्या आणि चमचे वाटले जात आहेत , ठाकरेसेनेचे नेते वसंत मोरेंनी हा प्रकार पुण्यात उघ़ड केलाय ..

दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये चक्कं मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या 19 वॉशिंग मशीन पोलिसांनी जप्त केल्या आहेत... उल्हासनगरच्या प्रभाग 3 मधील वन्सवाणी टॉवरमध्ये मिक्सर वाटप केल्याची माहिती समजताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धाड टाकली... आणि 17 मिक्सर जप्त केलेत...

आता ही निवडणूक पैशांचा धुरळा, चांदी, वॉशिंग मशीन आणि मिक्सर वाटण्यापर्यंतच मर्यादित राहिली नाही.. तर थेट देवालाही निवडणुकीच्या रिंगणात ओढण्यात आलंय...पनवेल मध्ये मतदारांना पैसे वाटण्याआधी मंदिरात बोलावलं जातय देवासमोर उभं राहून देवाची शपथ घ्यायला लावली जातेय. मी ज्याच्या कडून पैसे घेतोय त्यालाच पैसे देईल अशी शपथ घेतल्यानंतरच त्याला पैशांच पाकिट दिलं जातं.

नवी मुंबईत तर आंगंडीयांच्या हवाला मार्गाचा वापर केला जातोय . इथे मतदाराला 20 रुपयांची नोट दिली जाते, मग ती फाडून त्याचा अर्धा भाग त्याच्या हातात दिला जातो... मतदान केल्यानंतर 20 रुपयांची अर्धी नोट आणून दाखवल्यानंतर मतदाराला पैसे दिले जाणार आहेत . वाह रे वाह लोकशाही ....

सगळे कायदे नियम धाब्यावर बसवून हे सगळे फंडे वापरले जात असतानाच दुसऱ्या बाजूला पैशांचा पाऊसही सुरूच आहे.. सोलापूरमध्ये उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडल्याचं समोर आलंय. तर पनवेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप मनसेनं केलाय.. तीकडे चारकोपमध्येही पैसे वाटपाच्या आरोपावरुन राडा झालाय... तर चेंबूरमध्ये वॉर्ड 153 मध्ये शिंदेसेनेकडून पैसे वाटप करण्यात आलाचं स्पष्टचं दिसतय ... त्याचा सीसीटीव्हीच समोर आलाय.. तर या प्रकरणी शिंदेसेनेचा पदाधिकारी पप्पू भाटी याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय...

मतदानाच्या नावावर पैशांचा हा पाऊस खुलेआम सुरू असताना प्रश्न हाच की निवडणूक आयोग काय करत आहे..?पोलिस यंत्रणा नेमकी काय करत आहे? संविधानानं दिलेल्या अधिकाराचाच इथे थेट सौदा केला जातोय...मतदारांनी लोकशाहीची बूज राखणं अपेक्षितये मात्र मतदारचं लोकशाहीचे धिंडवडे काढत आहेत. घेणारे आणि देणारे दोघंही लोकशाहीची लक्तरं वेशीला टांगत आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

SCROLL FOR NEXT