mangala Express Stidents Poison AI Image
महाराष्ट्र

Mangala Express : भयंकर! शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना एक्सप्रेसमध्ये विषबाधा; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Mangala Express Students Food Poisoning News : दिल्लीहून त्रिचूरला शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना मंगला एक्सप्रेसमध्ये उलट्या व मळमळीचा त्रास झाला. भोपालनंतर प्रकृती बिघडल्याने भुसावळ येथे विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली.

Alisha Khedekar

  • दिल्लीहून त्रिचूरला शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना मंगला एक्सप्रेसमध्ये विषबाधा

  • भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

  • ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

  • रेल्वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासादरम्यान विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलमदरम्यान धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली.याघटनेनंतर रेल्वेत एकच खळबळ उडाली.

विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाला याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर खंडवा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या मेडिकल आणि कमर्शियल टीमसह अधिकारी दाखल झाले. अस्वस्थ विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे देण्यात आली. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास खंडवा स्थानकावर उतरून पुढील उपचार घेण्याचा सल्लाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, मंगला एक्सप्रेस रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचताच भुसावळ विभागाने विद्यार्थ्यांसाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था केली. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून स्थानकावर डॉक्टर, नर्स, रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली होती. त्याचबरोबर रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली. गाडी भुसावळ स्थानकावर आल्यानंतर डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीसाठी मंगला एक्सप्रेस सुमारे पाऊण तास स्थानकावर थांबवण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

या शैक्षणिक सहलीमध्ये एकूण ९३ विद्यार्थी आणि १२ शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यापैकी सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ असा त्रास झाला. यातील पाच विद्यार्थ्यांची प्रकृती तुलनेने अधिक बिघडली होती. त्यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून काही डॉक्टरांना विद्यार्थ्यांसोबत पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी भोपाल स्थानकावर जेवण केल्यानंतर त्रास सुरू झाल्याने जेवणामुळे विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Waterfall : हजारो रुपये खर्च करून दूर कशाला जायचं? 'हा' धबधबा देईल स्वित्झर्लंडचा फील

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात

Buldhana Accident: बोलेरोची दुचाकीला भयंकर धडक, बापाच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू, बायकोने प्राण सोडले; बुलढाण्यात हळहळ

Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव! नागपूरसह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा, धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT