Arvind Kejriwal Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अरविंद केजरीवाल यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर आज आपचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले होते.
यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासोबत असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी "आम आदमी पक्षाचं सरकार आल्यापासून दिल्लीतील लोकांवर अन्याय होत आहे. आप सरकारला काम करु दिलं जात नाही. ही लढाई दिल्लीची नसून संपूर्ण देशाची आहे," असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी शरद पवार यांच्याकडे विरोधकांची एकजूट करण्याची मागणी केली.
काय म्हणाले शरद पवार...
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिलं असून केंद्र सरकारच्या संभाव्य अध्यादेशाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. "देशातील लोकशाहीवर आघात सुरु असून ती टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचे," ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
केंद्र सरकारच्या कारभारावर आपचा संताप...
दरम्यान, यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या (BJP) दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. जिथं भाजपचं सरकार येत नाही तिथे मात्र भाजप आमदारांना फोडून, ईडी-सीबीआय पाठवून किंवा अध्यादेश आणून सरकारला त्रास दिला जातो. मात्र आता केंद्राने आणलेल्या अध्यादेशाला कडाडून विरोध केला पाहिजे. शरद पवार यांनी केंद्राच्या अध्यादेशाला विरोध करण्याची भूमिका घेतल्याने त्यांचं आभार मानतो, अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी भावना व्यक्त केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.