MP Hemant Godse Car Accident Delhi Saamtv
महाराष्ट्र

Hemant Godse Car Accident: मोठी बातमी! शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात

MP Hemant Godse Car Accident Delhi: नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १९ फेब्रुवारी २०२४

MP Hemant Godse Car Accident:

राजधानी दिल्लीमधून एक मोठी घटना समोर आली आहे. नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे आज राजधानी दिल्लीमध्ये आहेत. नवी दिल्लीमधील संसदेतील शिव जयंती उत्सव आटोपून हेंमत गोडसे हे आपल्या इनोव्हा कारमधून (क्र. MH 15 FC 9909) निवास्थानी जात होते.

यावेळी दिल्लीतील बी डी मार्गावर त्यांच्या गाडीला एका भरधाव ईर्टिगा कारने (DL 7CW 2202) जोरदार ध़डक दिली. या अपघातात खासदार हेमंत गोडसे हे सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या इर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले आहे.

ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याचनिमित्ताने राजधानी दिल्लीमध्येही काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांसाठी हेमंत गोडसे हे दिल्लीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Period Leave: नोरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार

HBD Rekha : ७१ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, रेखा यांच्या लांबसडक केसामागचं रहस्य काय?

कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT