राजकीय श्रेय घेण्यासाठी चिरड गावच्या पुलाच्या कामाला दिरंगाई. - भाजप आमदार गणपत गायकवाड  प्रदीप भणगे
महाराष्ट्र

राजकीय श्रेय घेण्यासाठी चिरड गावच्या पुलाच्या कामाला दिरंगाई. - भाजप आमदार गणपत गायकवाड

“पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झालेला आहे, मात्र राजकीय श्रेय घेण्यासाठी पुलाच्या कामाला दिरंगाई आहे” असा आरोप आमदार गायकवाडांनी केला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : खोणी तळोजा राज्य महामार्गावर Highway नजीक असलेल्या चिरड Chirad गावचा पूल हा धोकादायक झाला आहे. या पुलाचे संरक्षण कठडे नदी River पात्रात कोसळत आहेत. या विषयावरती बोलताना स्थानिक भाजपा आमदार MLA गणपत गायकवाड यांनी या पुलाच्या कामाल दिरंगाई केल्या प्रकरणावरून शिवसेनेवरती टीका केली आहे. “पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झालेला आहे, मात्र राजकीय श्रेय घेण्यासाठी पुलाच्या कामाला दिरंगाई आहे” असा आरोप आमदार गायकवाडांनी केला आहे. Delay in construction of Chirad village bridge to get political credit

कल्याण पूर्वेतील मलंगगड भागात असलेल्या चिरड गावचा पूल हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल थेट ग्रामीण भागाला राज्य महामार्गाशी जोडत असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

मात्र असं असताना या पुलासाठी आणि रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमार्फत या कामाला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी या पुलासह रस्त्याच्या कामाला दिरंगाई केली जात असल्याचा आरोप भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच गायकवाड यांनी सांगितले की निधी मंजूर कोणी करुण आणला, निधी मंजूर असून सुद्धा श्रेयवादासाठी पुलाचे काम सुरू केले नाही. श्रेयवादासाठी कोणाचाही जीव जाऊ नये. तसेच राज्य शासनाने पुलाला त्याच जे नाव द्यायचं आहे ते नाव द्यावे पण पुलाचे काम सुरू करावे असेही गायकवाड म्हणाले आहेत.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT