"ते राज्यात मंत्री असताना काय करू शकले नाही, केंद्रात मंत्री होऊन काय करणार!" SaamTV
महाराष्ट्र

"ते राज्यात मंत्री असताना काय करू शकले नाही, केंद्रात मंत्री होऊन काय करणार!"

"ते राज्यात मंत्री असताना पराभूत केले ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार" असा मजकुर असणारे हे बँनर शिवसेनेच्या शाखेबाहेर लावले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्याNarayan Rane जनाशीर्वाद यात्रेच्या JanaashirvadYatra पार्श्वभूमीवर कणकवलीसह जिल्ह्यात राणे विरुद्ध- शिवसेनाRaneVSShivsena संघर्ष सुरू आहे आज राणेंच्या जनाशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस आहे याच पार्श्वभूमीवर कणकवली Kankavali येथे जुन्या शिवसेना शाखेसमोर आमदार वैभव नाईक यांचा बॅनर अगदी दिमाखात झळकतोय.Defeated when he was a minister in the state, what will he do as a minister at the center

हे देखील पहा-

"ते राज्यात मंत्री असताना पराभूत केले ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार" असा मजकुर असणारे हे बँनर शिवसेनेच्या शाखेबाहेर लावले आहेत. नारायण राणेंची जनाशीर्वाद यात्रा सुरु झाल्यापासून सेना विरुध्द राणे संघर्ष काही केल्या कमी व्हायची चिन्हे नाहीत.

अगदी दोन दिवस राणेंच्या अटकनाट्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत संपुर्ण महाराष्ट्रात राणे-सेना संघर्षाची चर्चा होती. अशातच आत्ताचे आमदार खासदार पुढच्यावेळी दिसणार नाहीत असं वक्तव्य राणे यांनी आपल्या जनाशीर्वाद यात्रे दरम्यान केले होते.

दरम्यान या टीकेला उत्तर देताना म्हणा कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणा आणि राणेना खिजवण्यासाठी पुन्हा अशी बँनरबाजी कोकणात सुरु आहे या बॅनरच्या माध्यमातून नाव न घेता त्यांनी नारायण राणे यांना दिवस असण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे"ते राज्यात मंत्री असताना काय करू शकले नाही ते केंद्रात मंत्री होऊन काय करणार?" असे टिकास्त्र नाईक व शिवसैनिकांनी बॅनरच्या माध्यमातून सोडले आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईकांच्या बॅनर मुळे पुन्हा शिवसेना भाजप वाद चिघळेल की काय असा प्रश्न कोकणवासियांना पडला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT