Fact Check Saam TV
महाराष्ट्र

Fact Check : अयोध्येतील राम मंदिरामुळे लोकसभेत पराभव? शिर्डीच्या माजी खासदारांच्या VIRAL व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

Viral Video Fact Check : सदाशिव लोखंडे त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत मतदारसंघात रावणाला मानणारे बरेच आहेत, असं विधान करताना ते दिसतायत.

Ruchika Jadhav

सचिन बनसोडे - अहमदनगर

अयोध्येतील राम मंदिरामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, असा धक्कादायक निष्कर्ष शिवेसना शिंदे गटाचे शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय? यात किती तथ्य आहे हे या बातमीतून जाणून घेऊ.

सदाशिव लोखंडे त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत मतदारसंघात रावणाला मानणारे बरेच आहेत, असं विधान करताना ते दिसतायत. दरम्यान या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी, माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा केलाय.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला. जय -पराजयाची कारणमिमांसा करताना मी कोणाला दोषी मानत नाही. या निवडणुकीत माझे प्रयत्न कमी पडले, असं अगोदर लोखंडे यांनी म्हंटलं होतं.

मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी केलेल्या दाव्यावरून वादंग निर्माण झाले आहे. मतदारसंघात अकोले हा आदिवासी पट्टा आहे आणि तिथे रावणाला मानणारे बरेच आहेत. याशिवाय मतदारसंघात कारखानदाराचे गट -तट आणि साम्राज्य आहे. त्यांच्यातील वर्चस्ववादाच्या लढाईत माझा पराभव झाल्याचे विधान करताना सदाशिव लोखंडे व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत.

मात्र या व्हायरल व्हिडिओवर लोखंडे यांनी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे, असं म्हटलंय. तसेच निवडणुकीत माझे प्रयत्न कमी पडले, असं देखील त्यांनी या आधीच म्हंटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापूरमध्ये चाललंय काय? हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच, आणखी एक धक्कादायक VIDEO समोर

Ola- Uber: 'राईड कॅन्सल केली तर...'; ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित चालक वठणीवर येणार, नव्या कायद्यात काय?

BMC Election : बीएमसीत आमचे वाघ... जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना, निवडणुकीत कुणाला झटका बसणार?

Prarthana Behere: पवित्र रिश्ता फेम प्रार्थना बेहरेविषयी या गोष्टी माहित आहेत का?

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT