Deepak Kesarkar On Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: 'मला उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे, पण...'; दीपक केसरकरांकडून टीकेला चोख प्रत्युत्तर

Deepak Kesarkar News: उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केलेल्या टीकेवर मंत्री दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Dnyaneshwar Choutmal

Deepak Kesarkar News: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची आज जळगावात जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केलेल्या टीकेवर मंत्री दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मला त्यांच्याबद्दल आदर आहे, पण प्रत्येक वेळी मतांचे राजकारण करून राज्याचा विकास करता येत नाही, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

मंत्री दीपक केसरकरांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी केसरकांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना केसरकर म्हणाले, 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षाचे म्हणून टीका करत राहावी, आम्ही विकासाचे काम करत राहू. आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या विचारांवर चालू नका'.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना केसरकर पुढे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना सडकून टीका करण्याची सवय आहे. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. जेव्हा समृद्धी महामार्ग होत होता, तेव्हा त्याला कसा त्यांनी विरोध केला हे आपण सर्वांनी पाहिलं. मेट्रोला त्यांनी कसा विरोध केला हे सर्वांनी पाहिलेला आहे. त्यांच्यामुळे जेव्हा प्रकल्प होतात तेव्हा त्याला विरोध करायचा आणि जेव्हा नंतर प्रकल्प होता तेव्हा ते प्रकल्प मीच केले असं म्हणायचं याला काही अर्थ नाही'.

' महाराष्ट्राचा जेव्हा विकास होत असतो, तेव्हा त्यात राजकारण असता कामा नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, पण प्रत्येकवेळी मतांचे राजकारण करून राज्याचा विकास करता येत नाही. सध्या त्यांना दिलेली भूमिका योग्य आहे. त्यांनी विरोधी पक्षाचे नेतृत्व करून टीका करत राहावं आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं काम करत राहू, असेही दीपक केसरकर पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेतून ६० लाख महिलांना वगळणार; आमदाराला भीती, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं!

धावती लोकल पकडताना महिलेचा पाय घसरला अन्.. पालघर रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?

Chapati Shape: तुम्ही कधी विचार केलाय का? चपाती, भाकरी आणि पुरणपोळी गोलच का असते?

Taath Kana: डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणादायी कथा; 'ताठ कणा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Drunk Driver: नवी मुंबईत अपघाताचा थरार! कार चालकाकडून मद्यधुंद अवस्थेत ८ गाड्यांना धडक, VIDEO

SCROLL FOR NEXT