Cabinet Expansion Saam Digital
महाराष्ट्र

Cabinet Expansion: मी मंत्रिमंडळात असतो तर...; मंत्र्यांच्या शपथविधीनंतर केसरकारांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar : शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय. त्यावरून केसरकर यांनी विधान केलंय. साईबाबांच्या दर्शनाला आले असताना त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला होता.

Bharat Jadhav

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नागपुरातील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. नागपुरात शपथविधीचा सोहळ पार पडत असताना केसरकर शिर्डीच्या साईचरणी नतमस्तक होण्यासाठी आले. मंत्रिमंडळातून शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांना डावलण्यात आलंय. त्यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

मी मंत्रीमंडळात असतो तर काल साईबाबांचे दर्शन घेऊन आज नागपूर विधानभवन येथे स्पेशल विमानाने गेलो असतो. मी नसल्यामुळे त्या ठिकाणी फार फरक पडत नाही, असं विधान दीपक केसरकर यांनी केलंय. केसरकर हे आज शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पक्षाच्या निर्णयावर ते सहमती असल्याच म्हणत असले तरी डावललं गेल्यामुळे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

मागील सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री असताना आपण शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे निर्णय घेतले. मराठी भाषा विभाग हा दुर्लक्षित विभाग होता त्याला मराठी भाषा धोरण दिलं. आपण जे काही केलं त्यात आपण समाधानी, आहोत असं दीपक केसरकर म्हणालेत. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यावरही त्यांनी भाष्य केलंय. नव्या महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी दीपक केसरकर फिल्डिंग लावत होते. शपथविधी होण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली.

त्यांच्यासोबत तानाजी सावंत देखील होते. सुरुवातीला केसरकर यांना भेट देण्यास शिंदेंकडून नकार देण्यात होता. त्यानंतर त्यांना चर्चेसाठी बोललण्यात आलं. मंत्रिपद मिळणार नसल्याचं समजाताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती असं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी केसरकर शुक्रवारी पाच तास वर्षा बंगल्यावर थांबून होते. भेट झाली नसल्याने त्यांना नाराज होऊन परतावे लागले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता एकनाथ शिंदेंसोबत या दोन नेत्यांची भेट झाली. मात्र या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावरून आज दीपक केसरकर यांनी भाष्य केलंय.

साईबाबा जे काही घडवतात ते चांगल्यासाठीच होतं. आपण मागे शिक्षणमंत्री असताना अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. मराठी भाषा विभाग हा दुर्लक्षित होता, त्याला मराठी भाषा धोरण दिलं. शपथविधी सोहळा सोडून साईबाबांच्या चरणी आल्याप्रकरणी त्यांना प्रश्न करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, शपथविधी हा मंत्र्यांचा असतो, अधिवेशन हे आमदारांसाठी असते. उद्या सकाळ पासून अधिवेशन सुरू होणार असून मला सकाळी अधिवेशनसाठी जायचं आहे.

त्याअगोदर मी साईदरबारी आलोय. ज्या लोकांचा मंत्री म्हणून शपथविधी होणार त्यांना निरोप गेलेत त्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहिले. काही गोष्टी चांगल्यासाठी घडत असतात. मी दोन वेळा मंत्री म्हणून काम केलंय.आमचा कोकण विभाग दुर्लक्षित आहे. आपल्या विभागाची सेवा अधिकची करता यावी, अशी साईबाबांची इच्छा असेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल, असे केसरकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT