Deepak Kesarkar
Deepak Kesarkar Saam TV
महाराष्ट्र

Deepak Kesrkar: दीपक केसरकरांकडून अजित पवारांचे तोंडभरून कौतुक ; उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Deepak Kesrkar: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर नवीन वर्षानिमित्त साईचरणी लीन झाले आहेत. साईबाबांकडे काही मागण्याची गरज पडत नाही ते सर्व काही देतात, अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे केसरकर म्हणाले. तर अजित पवारांचे तोंडभरून कौतुक करत उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिपक केसरकर यांनी दिला आहे. (Latest Deepak Kesarkar News)

अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या मात्र धर्म नाही बदलला. शब्दछल करण्यात काही महत्व नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बाहेरून कठोर असले तरी त्यांचं मन मात्र निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतीत मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजितदादांसारखा असावा, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी अजित पवारांचं कौतुक केलंय.

तसेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला आदर असून कटुता कमी करणे उद्धवजींच्या हातात आहे. जेव्हा घर पेटते तेव्हा आधी आग विजवावी लागते. कशामुळे लागली ते नंतर बघू अगोदर आपण आपलं घर सुरक्षित ठेवू असं मी उद्धवजींना बोललो होतो. मला ते बोलले त्याचं दु:ख वाटलं नाही पण जे काही माध्यमात दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या.

प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळ्यांचे उत्तर देईल. त्यांच्या आजूबाजूचे लोक जे सांगतात त्यावर ते मत बनवत असतात. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही तर प्रेमाने मन जिंकाव लागतं. शिंदेंनी ४० आमदारांची मने जिंकली. निश्चित काहीतरी घडलं त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. मी जसं आत्मपरिक्षण केलं तसं उद्धवजींनी करावं, असा सल्ला केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT