Vijay Vadettiwar Saam TV
महाराष्ट्र

Vijay Vadettiwar on Draught : राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

Rain Update : कोकण सोडून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News :

राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं सावच निर्माण झालं आहे. ही सगळी परिस्थिती पाहता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

कोकण सोडून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप पिकं नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. मात्र सरकार सभा, उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहे. या सगळ्यात शेतकरी मात्र वाऱ्यावर आहेत.

जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, नाहीतर जनता तुम्हाला फिरू देणार नाही. राज्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना पॅकेज द्यावे लागेल, नाहीतर सरकारला पळता भुई होईल, अशी मागणी वजा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

८ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

हवामान विभाग दर गुरुवारी पुढील चार आठवड्यांचा अंदाज देत असते. ताज्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमीच राहील. पण ८ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील, अशी अपेक्षा आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. केएस होसाळीकर यांना व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT