Job Fair News : देशातील ५१ हजार तरुणांना आज मिळणार सरकारी नोकरी, PM मोदींच्या हस्ते होणार नियुक्तीपत्रांचे वाटप

PM Modi Rojgar Melava : रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
PM Modi Threat
PM Modi ThreatSaam tv

News Delhi :

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळ्याअंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. ही नियुक्तीपत्रे सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली जाणार आहेत. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.

पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार तरुणांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.  गृह मंत्रालयाच्या या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे विविध सशस्त्र पोलीस दल. पोलीस (ITBP), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) तसेच दिल्ली पोलीस भरती करत आहेत. (Latest Marathi News)

PM Modi Threat
Ajit Pawar Beed Sabha: बीडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं...

देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी, गृह मंत्रालयाच्या विविध संस्थांमध्ये, हवालदार (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि बिगर जनरल ड्युटी श्रेणीतील पदे, अशा विविध पदांवर रुजू होणार आहेत.

दिल्ली पोलीस तसेच सीएपी एफच्या बळकटीकरणामुळे , अंतर्गत सुरक्षेमध्ये मदत करणे, दहशतवाद-बंडाळी-नक्षलवादी कारवाया यांचा सामना करणे, आणि राष्ट्राच्या सीमांचे रक्षण करणे, यासारख्या बहुपेडी भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्यात, सर्व दलांना मदत होईल. (Political News)

रोजगार मेळावा, हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळावा, या पुढील रोजगार निर्मितीमध्ये चालना देणारा म्हणून काम करेल आणि युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

PM Modi Threat
Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी गुजरातला रवाना; अमित शहांची घेणार भेट, कारण काय?

नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे स्वयंप्रशिक्षण घेण्याची संधी देखील मिळत आहे. या अध्ययन सुविधेत, 673 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम, 'कुठेही कोणत्याही उपकरणावर’ या अध्ययन पद्धती मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com