Drought Situation In Nandgaon saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Faction : चांदवड, नांदगावात दुष्काळ जाहीर करा, शेतक-यांसह राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमक

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik NCP News : महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४० तालूके दुष्काळी (drought in 40 taluka of maharashtra) जाहीर केले आहेत. यामध्ये चांदवड (chandwad) व नांदगाव (Nandgaon) तालूक्याचा समावेश नसल्याने नेते मंडळींसह शेतकरी आक्रमक झाले आहे. या निर्णयाच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसने आजपासून (गुरुवार) बेमुदत उपाेषण सुरु केले आहे. (Maharashtra News)

चांदवड व नांदगाव तालूक्यात कमी पाऊस होऊनही ट्रिगर १ व ट्रिगर २ मध्ये बसत असताना शासनाने हे दोन्ही तालूके दुष्काळी जाहीर न केल्याने शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे. खरीप हंगामात पिकांची वाढ झालेली नाही,पिक जळून गेली तर नदी नाले,धरणात पुरेसा पाणीसाठा नसतांना कुठल्या निकषाच्या आधारावर सरकारने या दोन्ही तालूक्यांचा समावेश दुष्काळी यादीत समावेश केला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान शासनाने नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे (NCP Sharad Pawar Faction) नांदगाव तहसील कार्यालया जवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम टीव्हीशी बाेलताना राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे म्हणाले नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात यंदा अगदी कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यतील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जाळून गेली आहेत.

तालुक्यात अत्यंत कमी पाऊस होऊन ही ट्रिगर1 व ट्रिगर2 मध्ये बसत असताना शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झालेला नाही. शासनाने दुष्काळी यादीत नांदगावाचा समावेश करावा अशी मागणीही महेंद्र बोरसे यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT