औरंगाबाद विद्यापीठाचा निर्णय; पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत संपूर्ण फी माफ Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद विद्यापीठाचा निर्णय; पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत संपूर्ण फी माफ

ज्या विद्यार्थ्याचे आई, वडील किंवा पालक कोरोनामुळे मरण पावले आहेत, त्या विद्यार्थ्याचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फीस माफ करण्याचा निर्णय औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलाय.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: ज्या विद्यार्थ्याचे आई, वडील किंवा पालक कोरोनामुळे Corona मरण पावले आहेत, त्या विद्यार्थ्याचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फीस माफ करण्याचा निर्णय औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने BAMU घेतला आहे.

हे देखील पहा-

त्याशिवाय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफी आणि फी भरण्यास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कोरोनामुळे सर्व स्तरावरील कुटुंबाना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय.

आता विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयामुळे औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील पदवी, पदव्युत्तर उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने आधार दिला आहे.

कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व विभाग प्रमुख शैक्षणिक विभाग, सर्व विभाग प्रमुख उप परिसर उस्मानाबाद, संचालक उपपरिसर उस्मानाबाद व प्राचार्य सर्व संलग्नीत महाविद्यालये यांना कळविण्यात आले आहे.

यामध्ये,

१. ज्या विद्यार्थ्यांचे आई / वडिल / पालक कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे / विद्यार्थीनीनचे पदवी / पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्यात यावी.

२. अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन / उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क संगणक शुल्क, क्रिडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टीवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे.

३. प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५०% सवलत देण्यात यावी.

४. विद्याथ्र्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात यावे.

५. विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांत देखील इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन / उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रिडा निधी, वैद्यकीय मदत निधी, आणि युथ फेस्टीवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च कण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात यावे. त्याच प्रमाणे प्रयोगशाळा ग्रंथालय शुल्क यामध्ये ५०% सवलत देण्यात यावी.

६. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या वर्षाचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात यावे.

७. विद्यार्थ्याकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी, शुल्क थकीत असेल तर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची संलग्नीत महाविद्यालया मार्फत दक्षता घेण्यात यावी.

प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र शासन व व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार आपल्या स्तरावरुन यथा योग्य कार्यवाही करण्यात यावी व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोणतेच विद्यार्थी उक्त प्रकरणी वंचीत राहणार नाही याबाबत आपल्या स्तरावरुन दक्षता घेण्यात यावी, असे सांगितले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT