राहुल पुणाजी धांडे जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोला: बोअरवेल मशीनचा शॉक लागून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यु

अकोल्यातील दहिगाव गावंडे येथे एका शिक्षकाचा पाणी भरत असताना बोअरवेल मशीनचा शॉक (Shock) लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अॅड. जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील दहिगाव गावंडे येथे एका शिक्षकाचा पाणी भरत असताना बोअरवेल मशीनचा शॉक (Shock) लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुल पुणाजी धांडे असे मृतक शिक्षकाचे नाव असून ते धोतरडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. (Akola Latest News In Marathi)

गावात पिण्याच्या पाण्याचे नळ आले असताना पाणी भरायचे असल्याने बोअरवेल मशीन लावताना शिक्षक राहुल धांडे यांना त्या मशीनचा जबर शॉक लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. शिक्षक राहुल धांडे हे अकोल्यातील धोतरडी या गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर दहिगाव गावंडे गावात ते राहत होते. (Akola Local News Updates)

हे देखील पहा-

एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व हरपल्याने दोन्ही गावात खळबळ उडाली त्यांच्या जाण्याने दोन्ही गावात शोककळा पसरली आहे. अतिशय मनमिळावू व साधी राहणीमानाचे शिक्षक म्हणून त्यांची गावात ओळख होती. मृतक राहुल धांडे हे वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते डी. एन. खंडारे यांचे जावई होते. गावात आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी येताच सर्वांनाच धक्का बसला. अकोला रुग्णालयात त्यांना नेले असता ते मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (Latest News on akola)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT