UP Election: ...कारण आम्हाला भाजपला दुखवायचं नव्हतं; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेना समाजवादी पक्षासह इतर कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले.
Sanjay Raut on alliance in UP
Sanjay Raut on alliance in UPSaam Tv
Published On

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022) तोंडावर आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्याने तेथे भाजपला शह देण्यासाठी देशातील इतर पक्ष प्रयत्न करत आहेत. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (Shivsena) देखील उत्तर प्रदेशात 50 ते 100 जागा लढणार असे सांगितले होते. पण पक्ष नेमका कोणासोबत युती करेल याबद्दल माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना राऊतांनी जाहीर केले की, "उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेना समाजवादी पक्षासह (Samajwadi Party) इतर कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सपाशी हातमिळवणी केली असली तरी सेनेने स्पष्ट केले की, अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी आपले वैचारिक मतभेद आहेत." आपला पक्ष यूपीमध्ये 50-100 जागा लढवणार असल्याचे सांगत करत राऊत यांनी आज बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकैत यांची भेट घेतल्याचे उघड केले आहे.

तीन शेती कायद्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टिकैत यांचा (Rakesh Tikait) पश्चिम यूपीमधील जाट समुदायामध्ये मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. शिवाय मथुरा आणि अयोध्येतूनही शिवसेना उमेदवार उभा करणार असल्याचे राऊत यांनी ठामपणे सांगितले. (Latest News on Sanay Raut UP Alliance)

''...कारण भाजपला दुखवायचे नव्हतं''

राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता की, शिवसेनेने आतापर्यंत उत्तर प्रदेश निवडणूक कधीही लढली नव्हती. मग यावेळी सेनेने का पुढाकार घेतला? त्यावेळी राऊत म्हणाले, ''आम्ही यूपीमध्ये बराच काळ काम करत आहोत, पण निवडणूक लढवली नाही कारण आम्हाला भाजपला दुखवायचे नव्हते.'' (Shivsena To contest 50 seats in UP Election)

"आम्ही अयोध्येत, अगदी मथुरेतही उमेदवार उभा करू. काल मथुरेतील काही महत्त्वाच्या व्यक्ती मला भेटल्या. शिवसेनेने मथुरेतून प्रचाराला सुरुवात करावी, असा त्यांचा आग्रह होता. कारण अयोध्येच्या धर्तीवर मथुरेतही काही मुद्दे आहेत. पुढच्या काळात 2-4 दिवसांनी मी मथुरेला जात आहे,” ते पुढे म्हणाले.

Sanjay Raut on alliance in UP
Homeopathic Medicines: कोरोना, रोगप्रतिकार शक्ती अन् होमिओपॅथिक औषधे

यूपी निवडणुका

आगामी निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे, 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च तर मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. 15,05,82,750 नोंदणीकृत मतदार आहेत. मतदार यादीतील मतदान केंद्रांची संख्या १,७४,३५१ इतकी वाढली आहे. कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता 15 जानेवारीपर्यंत सर्व रॅली आणि रोड शो करण्यास बंदी घालण्यात आली असून मतदानाची वेळ 1 तासाने वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील यूपीच्या लोकांना बदल हवा आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी यूपीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com