धक्कादायक! विहिरीत पडलेला बॉल काढताना बुडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू विजय पाटील
महाराष्ट्र

धक्कादायक! विहिरीत पडलेला बॉल काढताना बुडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

क्रिकेट खेळताना विहिरीत गेलेला बॉल काढताना मृत्यू

विजय पाटील साम टीव्ही सांगली

विजय पाटील

सांगली: विहिरीत बुडून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. विहिरीत पडलेले बॉल काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन पडल्याने ही घटना घडली आहे. मिरज शहरामध्ये हा प्रकार घडला आहे. अफजल पठाण (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील पहा-

मिरज शहरातील इंदिरा नगर शेवकरे मळा येथे अफजल अमजद पठाण या मुलाचा विहिरी मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत अफजल हा आपल्या लहान भाऊ आणि मित्रासोबत रस्त्यावर क्रिकेट खेळत होता. यावेळी खेळताना बॉल हा गोपाळ कदम यांच्या विहारीत गेला. त्यामुळे बॉल आणण्यासाठी अफजल गेला असता त्याचा विहिरीत तोल जाऊन पडला.

त्यानंतर घाबरलेल्या लहान भावाने घरी जाऊन याची कल्पना दिली. त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी विहिरीत दोर टाकून आणि पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांनी अथक प्रयत्न करून अफजल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह सापडू शकला नाही. त्यानंतर सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून आयुष सेवा भावी संस्था आणि मिरज अग्निशमन पथकाने मिळून मृतदेह शोधून बाहेर काढला. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT