अहमदनगर : अहमदनगर शहरातील सावेडी भागात असलेल्या डॉ.गोपाळ बहुरुपी Dr. Gopal Bahurupi आणि डॉ.सुधीर बोरकर Dr. Sudhir Borkar संचलित न्युक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड केअर सेंटर येथे रुग्णाला मृत्यू नंतरही कोविडचे उपचार दिले गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, डॉक्टरांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षपणा मुळे साधा आजार असलेल्या रुग्णाला कोविडची ट्रिटमेंट Treatment दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Death of a patient due to incorrect treatment)
बबनराव नारायण खोकराळे Babanrao Khokrale वय - 79, रा. हनुमाननगर, सावेडी, नगर असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव असून, सदर रुग्णाच्या मुलाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या Mumbai High Court औरंगाबाद खंडपीठात Aurangabad Bench या संदर्भात याचिका दाखल केल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने येथील शासकीय यंत्रणेला या संदर्भात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयाने चौकशी समिती नेमुन याबाबतचा अहवाल कोर्टाला सादर केला आहे. या अहवालात संदर्भातील समितीने न्यूक्लिअस हॉस्पिटल Nucleus Hospital आणि अहमदनगर कोविड केअर सेंटर Ahmednagar Covid Care Center येथील डॉ. गोपाळ बहुरुपी आणि डॉ. सुधीर बोरकर यांचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. स्वतः सिव्हील सर्जन डॉ. सुनिल पोखरणा यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहा जणांच्या डॉक्टरांच्या समितीने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालामध्ये दोन्ही रुग्णालयांच्या दुर्लक्षणामुळे गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. रुग्णाचा कुठल्याही प्रकारचा RTPCR रिपोर्ट नसताना रुग्णाला COVID-19 ची ट्रीटमेंट दिली आहे. नातेवाईक, अथवा पेशंट यांची कुठल्याही प्रकारची संमती न घेता रुग्णास एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णाची सद्य परिस्थिती पेशंटला अथवा नातेवाईकांना डॉक्टर अथवा संबंधित व्यवस्थापनाने नातेवाईकांना कळविलेले नाही.
वास्तविक पाहता रुग्णाला रेमडिसिव्हर remdesivir देतांना काही शासकीय प्रोटोकॉल Government Protocol यांचे पालन करणे आवश्यक असते. एकाच दिवशीच्या आसपास रुग्णाला 5 रेमडिसिव्हर दिल्यामुळे रुग्णाची अवस्था गंभीर झाली. एकाच रुग्णालयात दोन वेगवेगळ्या वेळांना रुग्णाला मृत घोषित करण्यात आले. दोन्ही डेथ सर्टिफिकेटस् वेगवेगळ्या वेळांचे असूनही त्याबाबतही संबंधित समितीने न्यायालयाच्या निर्दशानास ही बाब आणून दिली. याशिवाय पेशंटचा मृत्यू झाल्यानंतरही नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली गेलेली नाही.
"मला नुकसान भरपाई नको तर माझ्या बाबतीत जे घडले आहे ते इतर रुग्णांच्या बाबतीत घडू नये. अशा चुकीच्या पद्धतीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना चांगला धडा मिळावा" ही उच्च न्यायालयाला विनंती केल्याचं देखील अशोक खोकराळे यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले परंतु कोरोना सारखा आजार नसताना त्या रुग्णांवर कोरोना ट्रीटमेंट करून त्याचा यात अंत होणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.