18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; तुळजापूरमधील हॉस्पिटलचा परवाना रद्द! कैलास चौधरी
महाराष्ट्र

Breaking : 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; तुळजापूरमधील हॉस्पिटलचा परवाना रद्द!

चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याने तुळजापूर शहरातील कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद : तुळजापूर शहरातील कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी दिले आहेत. चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

प्रतीक्षा प्रकाश पुणेकर या अठरा वर्षीय तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी या हॉस्पिटल वरती कारवाई करण्यात आली आहे. प्रतिक्षाच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी डॉ. दिग्विजय कुतवळ यांच्यावर गुन्हा नोंद करून वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करीत कारवाई करावी अशी मागणी केली होती. तसेच 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावरती डिझेल होतात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी डॉ.कुतवळ यांची चौकशी करण्यात आली. चौकशी समितीचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत बाबरे, डॉ.आर.यू. सूर्यवंशी, डॉ.ए.एस.धुमाळ या तीन तज्ञ डॉक्टरांच्या समितीने कुतवळ व त्यांच्या रुग्णालयातील कारभाराबाबत आक्षेप नोंदविले होते. प्रतीक्षा पुणेकरच्या उपचारा दरम्यान तज्ञ व्यक्तीचा सल्ला न घेणे, रुग्णाचे नातेवाईक यांनी पुढील उपचाराकरिता वारंवार विनंती करून सुद्धा प्रतिक्षाला रेफर न करणे असे निरीक्षण नोंदवले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT