१५ ऑगस्टला चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य, अजित पवारांचं मत
महापालिकांनी चिकन-मटण दुकान बंदीचे आदेश दिले
खाद्य स्वातंत्र्य आणि समाजभावना महत्त्वाची
शहरांमध्ये १५ ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉपवर बंदी घालण्याचा आदेशावरून सरकारमध्ये दुमत आहे. या निर्णयावरून सरकारमधील नेत्यांमध्ये एकमत नाहीये. अनेक शहरातील महापालिकांनी चिकन- मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश काढलेत. मात्र अशी बंदी घालणं अयोग्य असल्याचं उपमुख्यमत्री अजित पवार म्हणालेत. कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये, यावर बंदी घालणं अयोग्य आहे. श्रद्धेचा प्रश्न असला तर चिकन-मटण शॉपवर बंदी घातली जाते. समाज भावना लक्षात घेणं गरजेचं आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
खरं तर ज्या वेळेस श्रद्धेचा प्रस्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते. आषाढी एकादशी, महाशिवरात्री असे काही महत्वाचे दिवस असतात त्यावेळी. स्वातंत्र्य दिन. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे होताहेत. आपल्या देशात आपल्या राज्यात काही जण शाकाहारी मांसाहारी आहेत. कोकणात साधी भाजी करताना सोडे, सुकट बोंबील करतात. तो त्यांचा आहार आहे. काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तरी ते पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे त्यांचा तो आहार आहे. त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बदी घालणे योग्य आणि उचित नाही.
महत्वाच्या शहरांमध्ये अनेक जातीधर्माची लोक राहतात. भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती किंवा काही काळापुरती बंदी घातली तर लोक स्वीकारतात. परंतु, महाराष्ट्र दिन, २६ जानेवारी, १५ ऑगस्टला बंदी घालायला लागलात तर उलट अवघड आहे. ग्रामीण भागात ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असेल तर तो तसं जेवण घालून साजरा करतात.
माझं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहेत. भावनेचा आणि श्रद्धेचा विषय येईल त्या त्या वेळेस त्या विषयाकडे त्या अँगलने बघावे. देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर, आता आदिवासी समाजात बघायचं म्हटलं तर तर मांसाहाराचा आहार मोठ्या प्रमाणात असतो.
छत्रपती संभाजीनगर शहरात १५ आणि २० ऑगस्ट रोजी मांस विक्रीसाठी बंदी करण्यात आलीय. १५ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आणि २० ऑगस्ट रोजी जैन धर्मियांचे पर्युषण पर्व सुरू होत असल्यामुळे या दोन दिवशी कोणत्याही प्रकारची कत्तल करण्यास बंदी घालण्यात आलीय. यासोबतच विक्री करण्यासही बंदी करण्यात आलीय. याबाबतचा आदेश छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेने जाहीर केलाय.
पंधरा ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी अमरावती महानगरपालिका क्षेत्रात कत्तलखाने आणि मास विक्री दुकाने बंद ठेवा, असे आदेश अमरावती महानगरपालिकेने काढलेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.