Daund Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Daund News: पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नातीला पतीकडून अमानुष मारहाण, तिघांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Padmashree Dadasaheb Gaikwad: याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Priya More

प्रफुल्ल भंडारी, दौंड

Daund Police Station: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे सहकारी दिवंगत कर्मवीर दादासाहेब गायकवाड (Dadasaheb Gaikwad) यांच्या उच्चशिक्षित नातीला पतीकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दौंड पोलिसांनी (Daund Police Station) या प्रकरणी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली होती. पण पोलीस अधीक्षक यांच्या हस्तक्षेपानंतर १० तासांनी फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

'पद्मश्री'चे मानकरी आणि माजी खासदार असलेले दिवंगत दादासाहेब गायकवाड यांची नात डॉ. भावना चंद्रकात गायकवाड यांनी दंतवैद्यक शास्त्रात पदव्यूत्तर पदवी संपादित केली आहे. दौंड येथील दंतवैद्यक डॉ. सदानंद धुमाळ यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला आहे.

२२ मे २०२२ रोजी डॉ. सदानंद धुमाळ यांना दौंड शहरातील एका विवाहित महिलेबरोबर असलेल्या विवाहबाह्य संबंधांविषयी विचारणा केल्यावरून डॉ. भावना धुमाळ यांना मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ आणि बंधने घातल्याप्रकरणी सदानंद धुमाळ आणि त्यांच्या एकूण चार नातेवाईकांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटी व नागरी हक्क संरक्षण कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून डॉ. सदानंद धुमाळ यांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे.

याच दरम्यान १४ ऑगस्ट रोजी डॉ. सदानंद धुमाळ यांनी राहत्या घरी पत्नी भावना धुमाळ (वय ५२) आणि मुलीला पोटात आणि पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दौंड पोलीस ठाण्यात या बाबत सकाळी साडेआठ वाजता डॉ. भावना धुमाळ या फिर्याद दाखल करण्यासाठी गेल्या असता त्यांची फिर्याद घेण्यास पोलिसांनी नकार दिला.

दुपारी १२ वाजता पोलीस निरीक्षक ठाण्यात आल्यानंतर त्यांना बोलविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात फिर्याद घेण्यास टाळाटाळ सुरू होती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे भावना धुमाळ यांनी दौंड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेची तक्रार केली.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजता फिर्याद दाखल करण्यात आली. फिर्यादीनुसार सदानंद आप्पा धुमाळ (पती), रमेश सखाराम धुमाळ (दीर), वत्सला आप्पा धुमाळ (सासू , तिघे रा. धुमाळ मॅन्शन , स्वप्नशिव अपार्टमेंट समोर, गोपाळवाडी रोड, दौंड) यांच्याविरूध्द अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी प्रिव्हेनशन) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदानंद धुमाळ आणि अन्य दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर दौंड पोलिसांनी त्यांना अटक न करता भावना धुमाळ यांच्याविरूध्द इच्छापूर्वक दुखापत केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. उच्चशिक्षित महिला दंतवैद्यक आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीला बेदम मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींना त्वरीत अटक करणे आणि पोलीस ठाण्यात असलेल्या संशयित आरोपीस अटक न करता कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपाईंच्या आठवले गटाकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

शिक्षकांचा ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार; प्रशासकीय कामांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

SCROLL FOR NEXT