Daund Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: दौंडमध्ये अपघाताचा थरार, शाळकरी विद्यार्थिनीला डंपरने चिरडलं, थरकाप उडवणारा सीसीटीव्ही VIDEO

Daund Accident: दौंडमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीला डंपरने चिरडलं. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • दौंडमध्ये डंपरने शाळकरी विद्यार्थिनीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली.

  • अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला.

  • नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

  • ग्रामस्थांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मंगेश कचरे, बारामती

पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये डंपरने शाळकरी विद्यार्थिनीला धडक दिली. या अपघातामध्ये विद्यार्थिनीचे थोडक्यात प्राण वाचले. ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये भरधाव डंपरने शाळकरी विद्यार्थिनीला धडक दिली. कुरकुंभमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही घटना घडली. शाळकरी विद्यार्थिनीच्या दुचाकीला डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. डंपरने धडक दिल्यानंतर ही विद्यार्थिनी थेट पुढच्या बाजूला दुचाकीसह रस्त्यावर पडली. या अपघातामध्ये विद्यार्थिनी बचावली पण ती गंभीर जखमी झाली.

ही अपघाताची घटना घडताच चौकातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चालकाला डंपर पाठीमागे घ्यायला लावत जखमी विद्यार्थिनीला बाहेर काढण्यात आले. या घटनेत ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या पायाचे हाड देखील मोडलं आहे. श्रावणी जाधव असं अपघातामध्ये जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमी विद्यार्थिनीला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ग्रामस्थांनी गर्दीच्या भागात अवजड वाहनांचा प्रवेश रोखावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडच्या सरपंचाचा कारनामा! हवेत धाड धाड गोळ्या झाडल्या; घटना कॅमेऱ्यात कैद

Wardha : झोपेतच मृत्यूने गाठले; कुटुंबांवर मोठा आघात, मुसळधार पावसाने घराचे छत कोसळून दुर्घटना

Maharashtra Live News Update: आरोपांवर कायदेशीर भाषेत उत्तर देईल - धैर्यशील मोहिते पाटील

मोठी बातमी! मुंबई High Court बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसरात एकच खळबळ

Banjara Samaj : जालन्यात आदिवासी समाजाचा मोर्चा; बंजारा समाजाला आरक्षण नाकारण्याची मागणी | VIDEO

SCROLL FOR NEXT