Karishma Sharma Accident: धक्कादायक! धावत्या मुंबई लोकलमधून अभिनेत्रीने मारली उडी; कारण आलं समोर

Actress Karishma Sharma Mumbai Local Accident: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा शर्माने मुंबई लोकलमधून उडी मारली आहे. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली आहे.
Karishma Sharma Accident
Karishma Sharma AccidentSaam Tv
Published On

हिंदी सिनेविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा शर्माचा अपघात झाला आहे. करिष्मा शर्माने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. करिष्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. यात तिला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. तिने सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

Karishma Sharma Accident
Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

मुंबई लोकलमधून पडली

करिष्मा शर्मा ही मुंबई लोकलमधून प्रवास करत होती. मुंबई लोकलमधून प्रवास करताना ती ट्रेनमध्ये चढली. परंतु त्यानंतर तिच्या लक्षात आले की, आपल्यासोबतची इतर मंडळी ट्रेनमध्ये चढलीच नाही. त्यामुळे तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. यामुळे ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर मारल लागल्याची माहिती तिने दिली आहे. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करिष्मा शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर ही माहिती दिली आहे. तिने फोटो शेअर करत लिहलंय की, 'काल शूटिंगसाठी चर्चगेला ट्रेनने जायचे ठरवले. मी साडी नेसली होती. मी ट्रेनमध्ये चढली त्यानंतर ट्रेन सुरु झाली. माझ्या लक्षात आलं की, माझ्या मित्रांनी ट्रेन पकडलीच नाही. त्यामुळे मी उडी मारली आणि पाठीवर पडले. माझ्या डोक्यालादेखील मार लागला आहे.'

Karishma Sharma Accident
Tejashri Pradhan-Subodh Bhave: तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या वयातील अंतर किती?

करिष्माने सांगितलं की, माझ्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. शरीरावर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी MRI करायला सांगितले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मला खूप वेदना होत आहेत. मला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करा, असंही तिने सांगितलं आहे.

Karishma Sharma Accident
Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com