पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आजी-माजी मंत्री आज इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार सन्मान सोहळ्यासाठी एकाच व्यासपीठावर आले होते. Dattatraya Bharane and BJP leader Harshvardhan Patil on the same stage
हे देखील पहा-
यावेळी पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याची मागणी एस. एम. देशमुख यांनी केल्यानंतर त्याचा धागा पकडत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकारचे मंत्री उपस्थित आहेत. ते बघतील सध्या आम्ही विश्रांती घेतोय मात्र त्यांनी जर हे प्रश्न नाही सोडवले तर मग मात्र आम्ही दिल्ली दरबारातून ते सोडवण्याचा प्रयत्न करूच असे म्हणताच सर्व उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच तुम्ही जरी दुर्लक्ष केलं तरी पत्रकारांच काही कुणावाचून कधी आडत नाही असं म्हणायलाही हर्षवर्धन पाटील विसरले नाहीत.
आपल्या राज्यातील आणि देशातील राजकारणाची एक वेगळी परंपरा आहे विरोधक एकाच व्यासपीठावरती आले की ते आता काय बोलणार याची सर्वांना आतुरता असते अशातच कट्टर विरोधक एकत्र आले की मग तर सवाल जवाबच त्या व्यासपीठांवरती पहायला मिळतात. अगदी गोपिनाथ मुंढे आणि विलासराव देशमुख यांच्या पासून ती परंपरा सुरु आहे त्यामुळे इतरवेळी एकमेकांना पाण्यात बघणारे नेते समोरासमोर बघताना मात्र टीका जपून करतात आणि तीच आपल्या लोकशाहीची खासियत आहे.
मात्र अलिकडे टीकेचा स्तर घसरत आहे आत्ताच झालेल्या राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणावरुन पहिलं राजकारण आता उरल नाही असाच सुर सामान्य नागरिकांमध्ये आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.