Dattatray Bharne Saam Tv
महाराष्ट्र

Dattatray Bharne: कृषिमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच दत्तात्रय भरणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी...

Maharashtra Politics: कृषिमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच दत्तात्रय भरणेंनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी कृषी विभागातील एमपीएससीमध्ये उत्तीर्ण झालेल्या १४ जणांची नियुक्ती करणाऱ्या पत्रावर सही केली.

Priya More

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. कृषिमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी पदभार स्वीकारताच कृषी विभागातील एमपीएससीमध्ये उत्तीर्ण झालेल्या १४ जणांची नियुक्ती करणाऱ्या पत्रावर सही केली. त्यामुळे १४ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज मी कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत त्यामुळे मला हे खातं मिळाले आहे. मी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतले जातील.'

कृषीमंत्री भरणे यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार आहे. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा विकासासाठी निर्णय घेण्यात येतील. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्न करेल.'

दरम्यान, पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये रमी गेम खेळतानाचा माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. रमी गेम खेळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आले आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आले. तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खातं देण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle Photos: नऊवारी साडी अन् करारी नजर, रूपालीचा मराठमोळा लूक पाहून व्हाल फिदा

Nepal Protest : नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, विमानतळ बंद

Dry Skin Care: ड्राय स्किनला करा बाय बाय, अंघोळीनंतर करा 'हा' घरगुती सोपा उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

मंदिरात भेटायला बोलावलं, अपरहण करत हॉटेलवर नेलं; तरुणीवर गँगरेप करत....

Maharashtra Live News Update: कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावर खाली कोसळला अन् जीव गमावला

SCROLL FOR NEXT