दत्ता भरणे यांना सोलापूरात फिरू देणार नाही शिवसेना जिल्हा प्रमुखांचा इशारा  Saam Tv
महाराष्ट्र

दत्ता भरणे यांना सोलापूरात फिरू देणार नाही शिवसेना जिल्हा प्रमुखांचा इशारा

संपूर्ण जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून (Shivsena) संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.

भारत नागणे

सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharane) यांनी सोलापुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाबत एक व्यक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून (Shivsena) संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. ''शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेले विधान हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही'' असा इशारा शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Muncipal Corporation) वतीने 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव रोड येथे 43 एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्‍ता भरणे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन तोंडभरुन कौतुक केलं होते.

त्यानंतर पालकमंत्रा दत्ता भरणे यांनी बोलायला सुरुवात केली. महापौरांशी बोलताना दत्ता भरणेंची जिभ घसरली आणि म्हणाले "मुख्यमंत्र्यांचं जाऊद्या मरू द्या, आपल्या निधीतून गार्डन तयार करू" या विधानाने सोलापुरमध्ये चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर दत्ता भरणे यांनी याचे स्पष्टिकरण देत माफी देखील मागितली. या वक्तव्याने शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी देखील आक्रमक विधान केले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT