विदर्भातील ६ जिल्ह्यामधील औद्योगिक प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी Saam Tv
महाराष्ट्र

विदर्भातील ६ जिल्ह्यामधील औद्योगिक प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी

जिल्ह्यांमधील औद्योगिक प्रदूषणाच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामध्ये नागपूरसह विदर्भातील अकोला, वर्धा, वणी, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय डाफ

विदर्भ : जिल्ह्यांमधील औद्योगिक Industrial प्रदूषणाच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामध्ये नागपूरसह Nagpur विदर्भातील अकोला, वर्धा, वणी, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट Cement कारखाने आणि कोळसा खाणींमुळे या जिल्ह्यांमधील हवा आणि पाणी Water प्रदूषित होत आहे. Danger level reached by industrial pollution in 6 districts of Vidarbha

महाराष्ट्र Maharashtra प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून ही गंभीर बाब पुढे आली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्प सिमेंट कारखाने भूमिगत व खुल्या कोळसा खाणी, स्टील प्लांट, मॅग्नेट खाणी, मद्य निर्मिती कारखाने, रासायनिक कंपन्या असे शेकडो उद्योग व कारखाने आहेत. या उद्योगांमधून हवेत सोडला जाणारा विषारी धूर आणि नद्यांमध्ये सोडले, जाणारे प्रदूषित पाणी यामुळे वायू आणि जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

हे देखील पहा-

नागपूरात २०१८- १९ साली हिंगणा एमआयडीसी MIDC मॉनिटर स्टेशन वरून केलेल्या सर्वेक्षणानुसार Survey प्रदूषणाचा तर सरासरी २३३ मायक्रोग्रम मीटर वर गेला आहे. ९० ते १०० च्या मर्यादे पर्यंत तो समाधान कारक मानला जातो. इतर ४ जिल्ह्यांमधील प्रदूषणाचा तर देखील वर गेला आहे. Danger level reached by industrial pollution in 6 districts of Vidarbha

प्रदूषणामुळे शेकडो एकर परिसरातील पिकांची उत्पादकता घटली असून, झाडांवरही परिणाम झाला आहे. मानवी आरोग्यावर सुद्धा याचे भीषण परिणाम होताना दिसत आहेत. धुळी कणांमुळे त्वचा कॅन्सर, लंग कॅन्सर Cancer आणि श्वसनाचे आजार बळावले जात आहेत. या वाढलेल्या प्रदूषणामुळे निसर्गसमृद्ध विदर्भाच्या जिल्ह्यांमधील नागरिकांचा श्वास कोंडताना दिसत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT