महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे १८ गावांना लाखाला चुना

जिल्ह्यातील कळंब शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिकसळ गावात गेल्या अनेकवर्षांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे १८ गावांना लाखाला चुना
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे १८ गावांना लाखाला चुनाविश्वभूषण लिमये
Published On

विश्वभूषण लिमये

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब Kalamb शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिकसळ Diksal गावात गेल्या अनेकवर्षांपासून महावितरणच्या MSEDCL भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. काल तर एका रात्रीत ४२ टीव्ही, २६ फ्रीज, ४९ फॅन, कुलर, मोबाईल, चार्जर आणि ५०० पेक्षा अधिक बल्ब मधून धूर निघाला आहे. Villages have to suffer due to mismanagement of MSEDCL

त्यामुळे डिकसळ गावकऱ्यांचे १७ ते १८ लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. एवढे सगळे रामायण घडून देखील, आपल्याच मस्तीत सुस्त असलेल्या प्रशासनला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांच्या घरात धूर काढणाऱ्या महावितरणने झालेल्या नुकसाणीची भरपाई द्यावी, अन्यथा प्रशासनाविरुध्द्व गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीला लागले आहेत.

हे देखील पहा-

गेल्या अनेक वर्षांपासून डिकसळ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. एकाच डीपीवर DP सगळ्या गावचा कारभार लादल्यामुळे चिमणीच्या उजेडासारखा उजेड पडत आहे. ६ महिन्यात १० वेळा येथील ट्रांसफार्मर जळाला आहे. पावसाचा थेंब किंवा वाऱ्याने पान जरी हालले तरी वीज गुल होत आहे. याबाबत महावितरण कार्यालायाकडे सातत्याने ग्रामस्थांनी पाठपुरावा केला, तरीही मुजोर प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. Villages have to suffer due to mismanagement of MSEDCL

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे १८ गावांना लाखाला चुना
फिरायला जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार - अजित पवार 

यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण विरोधात जोरदार रणशिंग फुंकत आंदोलन उभा करायला सुरुवात केली आहे. गावात वीज कमी दाबाने वीज पुरवठा होणे, वारंवार लाईट जाणे, यासारख्या शेकडो समस्यांना गावकरी तोंड देत आहेत. त्यातच काल रात्री अधिक दाबाने विद्युत प्रवाह तारेत सोडण्यात आला होता. एका क्षणात लाखो रुपयांचे गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच गावात लाईट नसल्यामुळे गावात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान,विजेच्या तारा डोक्याला लागल्यामुळे, आतापर्यंत गावातील ३ जणांचा बळी गेला आहे.

यासारख्या शेकडो समस्यांनी अडचणीत सापडलेल्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग तरी कधी येणार, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. निष्क्रिय अधिकारी आणि मुजोर खाजगी गुत्तेदारीमुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवावर उठलेल्या महावितरण कार्यालयात चकरा घालून सामान्य गावकरी मेटाकुटीला आला आहे. Villages have to suffer due to mismanagement of MSEDCL

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com