पाथ्रड गोळे येथील धरण ओव्हरफ्लो; 26 वर्षात प्रथमच जूनमध्ये विसर्ग... प्रसाद नायगावकर
महाराष्ट्र

पाथ्रड गोळे येथील धरण ओव्हरफ्लो; 26 वर्षात प्रथमच जूनमध्ये विसर्ग...

नेर तालुक्यातील पाथ्रड गोळे येथील यवतमाळ पाटबंधारे विभाग अंतर्गत येणारे धरण तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद नायगावकर

यवतमाळ - जिल्ह्यातील नेर Ner तालुक्यातील पाथ्रड गोळे Pathrad Gole येथील यवतमाळ पाटबंधारे विभाग अंतर्गत येणारे धरण Dam तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने ओव्हरफ्लो overflow झाले आहे. जिल्ह्यातील धरण यावर्षी पूर्णपणे भरल्याची ही पहिलीच घटना आहे. नेर येथून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावरील पाथ्रड गोळे येथे यवतमाळ पाटबंधारे विभागा अंतर्गत लघु प्रकल्प आहे. Dam overflow at Pathrad Gole

कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले आहे. जनजीवन थांबल्यामुळे प्रदूषणाचा टक्का नीचांकी पातळीवर आला. यामुळे निसर्गाने जणू कात टाकली. यावर्षी निसर्गात अनेक बदल घडून आले. इतके वर्ष निसर्गाची झालेली हानी काही अंशी का होईना यावर्षी थांबून नवनिर्मितीची पहाट सुरू झाली. कधी नव्हे तो यावर्षी सुरूवातीपासूनच तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.

सर्वसाधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लहान मोठे धरणे ओवरफ्लो होतात. तालुक्यातील पाथ्रड गोळे येथील धरण सप्टेंबरमध्ये ओव्हरफ्लो होत असते. नेरकरांसाठी हे धरण संजीवनी देणारे आहे. याच धरणाच्या पाण्यावर शहराचा पिण्याच्या पाण्याचा डोल्हारा असतो. तब्बल 26 वर्षानंतर प्रथमच हे धरण जून महिन्यात पूर्णपणे भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरण भरल्याचे समजताच नेरकरांनी ही आनंद पर्वणी आपल्या डोळ्यात साठावी म्हणून धरणाकडे धाव घेतली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT