खोदकाम करताना शिबला घाटात सापडले पुरातन कोरीव दगडी खांब !

शिबला पार्डी या वळण रस्त्यावर रस्तारुंदी मध्ये पुरातन दगडी कोरीव खांब सापडले आहेत.
खोदकाम करताना शिबला घाटात सापडले पुरातन कोरीव दगडी खांब !
खोदकाम करताना शिबला घाटात सापडले पुरातन कोरीव दगडी खांब ! प्रसाद नायगावकर

प्रसाद नायगावकर / प्रेम नरडलवार

यवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील झरीजामणी ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. शिबला पार्डी या वळण रस्त्यावर रस्तारुंदी मध्ये पुरातन दगडी कोरीव खांब सापडले आहेत. During excavations, ancient carved stone pillars were found in Shibla Ghat

हे कोरीव दगडी खांब नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. याविषयी तज्ञ अभ्यासकांकडून व पुरातत्त्व विभागाकडून Archeology department संशोधनाची गरज असून या भागात प्राचीन काळी कोणते साम्राज्य होते किंवा आणखीन काय होते हे पाहणे गरजेचे आहे.

हे देखील पहा-

हा भाग पूर्वीपासूनच आदिवासीबहुल भाग आहे. झरी तालुक्या पासून जवळ असलेल्या कायर येथे गोंड राजा Gond king च्या साम्राज्याचे अस्तित्व होते, असे बोलल्या जात. कदाचित या भागापर्यंत गोंड राज्याचे साम्राज्य Empire असावे. येथे सापडण्यात आलेले कोरीव दगडी खांब राजवाड्याचे अवशेष आहे की आणखीन काय आहे याचे पुरातत्व विभागाकडून व तज्ञ व्यक्तीकडून संशोधन होणे गरजेचे आहे.

खोदकाम करताना शिबला घाटात सापडले पुरातन कोरीव दगडी खांब !
कोकण रेल्वे व महामार्ग अधिकाऱ्यांना सुनिल तटकरेंनी सुनावले खडे बोल

जेणेकरून या भागात असलेल्या आणखीन पुरातत्त्व अवशेषांचा शोध लागेल, या भागाचे महत्त्व वाढेल. झरी Zari सारख्या छोट्या तालुक्यात अनेक रहस्यमय बाबी अवशेष पुरातन काळापासून आहेत. परंतु ते दुर्लक्षित आहेत. यापूर्वी झरी पासून सहा किलोमीटर अंतर असलेल्या खापरी जंगलात विविध आकाराचे पुरातन   दगड सापडले आहेत. मंगली येथे पुरातन  मंदिर आहे. या भागात सापडलेल्या पुरातन अवशेषांनी पुरातत्त्व वस्तूंचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना चांगली संधी निर्माण होऊ शकेल व या भागातील महत्व विशद होईल.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com