dalmia sugar factory declare rs 3300 frp for sugarcane assured raju shetti saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti : 'स्वाभिमानी' पुढे 'दत्त-दालमिया'चे प्रशासन नमले, राजू शेट्टींचे आंदाेलन स्थगित

राजू शेट्टींनी कारखानास्थळावर ठिय्या मांडल्यानंतर दत्त दालमिया कारखान्यावर पाेलीसांनी तगडा बंदाेबस्त ठेवला हाेता.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखाना प्रशासनाने ऊसाला पहिली उचल रुपये 3300 देण्याचे मान्य केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (swabhimani shetkari sanghatana) मंगळवारी रात्री उशिरा काटाबंद आंदोलन स्थगित केले. त्याबाबतची माहिती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिली. (Maharashtra News)

पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काटाबंद आंदोलन छेडण्यात आले. जो पर्यंत प्रशासन उसाला 3384 रुपये पहिली उचल जाहीर करत नाही तोपर्यंत काटा बंद आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर करीत तेथेच ठिय्या मांडला हाेता.

दत्त दालमिया प्रशासनाने एफआरपी अधिक 100 रुपयांमधील 84 रुपयांसाठी वरीष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवून निर्णय घेण्याचे स्वाभिमानीला आश्वासन दिले. यापूर्वी कारखान्याकडून 3200 रुपये पहिली उचल जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. मात्र एफआरपीच 3284 रुपये बसत असल्याने स्वाभिमानीने 3200 रुपयांच्या पहिल्या उचलीला विरोध केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर कारखाना प्रशासनाने 3300 रुपये पहिली उचल देण्याचे मान्य केल्याने तब्बल आठ तासानंतर स्वाभिमानीने आंदाेलन स्थगित केले. परिणामी आता साखर कारखाना पुर्ववत सुरु झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

SCROLL FOR NEXT