Pune Marathi News SaamTV
महाराष्ट्र

शिंदेंच्या मिशन टायगरला दादांचा ब्रेक? मविआ नेत्यांवरून महायुतीत रस्सीखेच? धंगेकर, बाबर राष्ट्रवादीत जाणार?

Ajit Pawar : माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या सेनेला आणि विरोधकांना आणखी एक धक्का देण्याची रणनिती आखली जातेय.

Prashant Patil

मुंबई : शिवसेनेच्या मिशन टायगरची पुण्यात मोठी चर्चा असतानाच त्यामध्ये ट्विस्ट आलाय. पुण्यातील शिंदे गटात जाणारे माजी आमदार आता दादांकडे झुकू लागल्याची चर्चा आहे. नेमका दादांनी का लावला ब्रेक? शिंदेंना दादांनी पुण्यात का शह दिला? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या सेनेला आणि विरोधकांना आणखी एक धक्का देण्याची रणनिती आखली जातेय. शिवसेनेच्या मिशन टायगरची चर्चा सुरु आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात शिवसेनेचं हे मिशन जास्त चर्चेत आहे. कारण काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी धंगेकरांचं भगवं उपरण घातलेलं स्टेटस चर्चेत आलं होतं.

शिंदेंच्या मिशन टायगरला दादांचा ब्रेक?

धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली होती. तसेच ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही शिंदे सेनेत जाणार अशी चर्चा आहे. मात्र या चर्चांमध्ये आता ट्विस्ट आलाय. कारण शिंदेंच्या "मिशन पुणे" ला अजितदादांकडून ब्रेक लागलाय, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी रवींद्र धंगेकर आणि महादेव बाबर यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. मी कुठल्या ही पक्षात असलो तरी सुद्धा प्रत्येक पक्षाशी कौटुंबिक संबंध जपले आहेत, अशी प्रतिक्रीया धंगेकर यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांना पक्षात घेण्यावरून रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे विरूद्ध अजीत पवारांमधे कोल्ड वॉर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मतभेद समोर आले होते. अगदी तत्कालीन मंत्र्यांनी थेट अजित पवार आणि अर्थखात्यावर हल्लाबोल केला होता. आता पुणे जिल्ह्यातील राजकारणावरुन पुन्हा दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतायेत. आता धंगेकर आणि बाबर हे धनुष्यबाण हाती घेणार की हाती घड्याळ बांधणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT