Cyclone Mocha
Cyclone Mocha Saam TV
महाराष्ट्र

Cyclone Mocha : अस्मानी संकट! नांदेडमध्ये मोचा चक्रीवादळाचा कहर; गोठा कोसळल्याने जनावरे दगावली

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

Mocha Cyclone In Nanded: राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असतानाच आता चक्रीवादळाने मोठं थैमान घातलं आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मोचा या चक्रीवादळाचा फटका नांदेड जिल्ह्यालाही बसला आहे. यामध्ये शेतीचे मोठे नुकसाना झाले आहे. तसेच जनावरे देखील जखमी झाली आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रात्री गाढ झोपेत असतानाच नांदेड (Nanded) जिल्ह्यातील काही गावांमध्ये अचानक चक्रीवादळाने थैमान घातले. या चक्रीवादळाचा फटका नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नंदगाव, नदंगावतांडा, कुपटी, सोनपेठ या गावांना बसला आहे.

या चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडाली तर जनावराचे गोठे कोसळल्याने काही जनावरे दगावली आहेत. जनावरांना मार लागल्याने अनेक जनावरे जखमी झाली आहेत. या चक्रीवादळाच्या फटक्याने आंब्याची मोठ मोठी झाडे देखील मोडून पडली आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसलाय.

त्याचबरोबर नंदगाव भुजंग नगर येथे विद्युत पोल देखील तुटून पडल्याने याचा फटका विद्युत महावितरणला देखील बसलाय. विद्युत पोल तुटून विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा घरावर पडल्या आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु या भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जालन्यात मुसळधार पावसाला सुरुवात

जालना जिल्ह्यात आज सकाळपासूनच अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हात ताशी किमान 40 कि.मी.वेगाने वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ही हवामान खात्यानी वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आंबा पिकांसह शेतातील मक्का आणि बाजरी आणि कांदा बीज उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीच भर पडलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Today's Marathi News Live: मान्सून आज अंदमानात दाखल होणार, महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळणार

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

Pune Metro News: पुणेकरांसांठी गुडन्यूज! फक्त १०० रुपयांचा पास अन् मेट्रोने करा दिवसभर प्रवास; काय आहे नवी योजना?

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT