Maharashtra Weather Update: राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळी पावसाचे, या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा

Unseasonal Rain Alert: राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट अद्याप संपले नाही.
Rain Update
Rain Update Saam Tv
Published On

Mumbai News: गेल्या एक महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. पावसासह झालल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे सावट अद्याप संपले नाही. हवामान खात्याने पुन्हा राज्यात पुढचे पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची (Hailstorm) शक्यता आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

Rain Update
Gautami Patil Viral Video: अखेर शाेधून काढलंच! गौतमीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात

विदर्भात गारपिटीची शक्यता -

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात बुधवारी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. या भागातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Rain Update
Supriya Sule Morning Walk: मॉर्निंग वॉकला निघालेल्या सुप्रिया सुळेंना सफाई कर्मचाऱ्याने थांबवलं, अन् विनंती करत म्हटलं...

मराठवाड्यात मघगर्जनेसह पाऊस -

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 4 आणि 5 मे रोजी मराठवाड्यातील अनेक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊसाचा अंदाज आहे. तर अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे 6 आणि 7 मे रोजी मराठवाड्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain Update
Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेर बंदोबस्त वाढवला, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा निर्णय

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन -

धुळे, नंदुरबार, पुणे, लातूर या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वारा आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या भागात पाऊस तर होणारच आहे पण त्यासोबत दिवसा प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहान हवामान खात्याने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com