जयेश गावंडे
अकोला - मोबाईलवरील अनेक आर्थिक व्यवहार करणारे अॅप हे आपल्या ओळखीचे नसतात. तरी आपण त्या अॅपवर जाऊन तिथे आर्थिक व्यवहार करतो. त्या अपवरून आपली फसवणूक झाली की लगेच फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असाच एक फसवणुकीचा प्रकार अकोल्यात घडला आहे. सायबर पोलिसांनी अशाच एका तक्रारकर्त्याचे पाच लाख रुपये त्यांना परत मिळवून दिले आहे.
हे देखील पहा-
जास्त व्याजदराच्या अमिषाला बळी;
अशी एक घटना ता. 30 ऑगस्टला अकोल्यात घडली आहे. एका उच्चशिक्षीत व्यक्तीने जास्त व्याजदरच्या आमिषाला बळी पडुन एक अनोळखी अॅपवर एकदोन हजार नव्हे तब्बल पाच लाख रूपये भरले. परंतु, नंतर अॅप अपडेटच्या नावाखाली आणखी पैशाची मागणी होऊ लागली. तक्रारदार यांनी नॅशनल सायबर काईम पोर्टलवर तकार दाखल केली. संबंधीत तक्रारीचे गांभीर्य ओळखुन तात्काळ सायबर पोलीस स्टेशनकडुन त्यावर कारवाई करण्यात आली.
सायबर पोलिसांच्या तत्परतेने फिर्यादी यांना त्यांचे संपुर्ण पाच लाख रुपये परत मिळुन दिले. सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, ओमप्रकाश देशमुख यांनी केली. पोलीस अधिक्षक यांचे आवाहन कमी वेळात जास्त नफा तसेच अधिक व्याजदर ना बळी न पडता त्याची संपुर्ण शहानिशा केल्याशिवाय आर्थीक व्यवहार करू नये. तसेच ऑनलाईन अपव्दारे कर्ज घेत असाल तर सावधगिरीने व्यवहार करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नागरिकांना केले आहे.
खोट्या फोन कॉल्सला नागरिकांनी बळी पडू नये;
इंटरनेटमुळे सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात. त्यामध्ये बँकिंग क्षेत्राचे व्यवहारसुध्दा आपण ऑनलाईन करतो. परंतु, आपण बॅकिंग व्यवहार करतांना सुरक्षितरित्या करने आवश्यक झाले आहे. अलिकडील काळात नागरिकांची अश्या व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, काही नागरिक हे काही फसव्या फोन कॉलला बळी पडतात व त्यांची फसवणुक केली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये ग्राहकांना बँकेचे अधिकारी/कर्मचारी असल्याचे भासविले जाते.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.