teacher election duty  Saam tv
महाराष्ट्र

शिक्षकांची परीक्षा; इलेक्शन ड्युटी होणार रद्द

teacher election duty : शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. परीक्षा असलेल्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द होणार आहे.

Vishal Gangurde

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणार

CTET परीक्षा देणाऱ्या सुमारे 2,000 शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द

परीक्षा असलेल्या शिक्षकांना मिळाला दिलासा

विश्वभुषण लिमये, साम टीव्ही

राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर ९ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिक्षकांना इलेक्शन ड्युटी करावी लागणार आहे. परंतु काही शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द होणार आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असलेल्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द होणार आहे. मतदानच्या दिवशीच परीक्षा असल्याने या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याचा निर्णय सोलापूर प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे 2 हजार शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द होणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. याच दिवशी CTET म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देखील होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांनी अर्ज केले आहेत. या सर्व शिक्षकांची माहिती प्रशासनाने मागवली आहे.

ज्या शिक्षकांची परीक्षा असेल, त्यांना निवडणूक ड्युटीतून सवलत दिली जाणार आहे. त्यांच्या ऐवजी इतर पर्यायी शासकीय कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटीसाठी नियुक्ती होईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे परीक्षा असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

जिल्हा परिषदांसाठी सात तारखेला साडेपाचपर्यंत मतदान आहे. या मतदानासाठी साहित्य घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जाणे आणि नंतर सामान जमा करणे, यासाठी कमीत कमी रात्री 11 ते 12 वाजण्याची शक्यता असते. त्यानंतर घरी कधी जायचं.

दुसऱ्या दिवशी सेंटरला परीक्षा देण्यासाठी कधी पोहोचायचे हा एक खूप मोठा प्रश्न पडलेला होता. मग दुसर्‍या दिवशी सीटीईटी पेपर कसा द्यायचा, तेही दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता सेंटरवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे परीक्षा असलेल्या शिक्षकांचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, आजच्या निर्णयाने परीक्षा असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वणी-सप्तशृंगी गड मार्गावर भीषण अपघात, थार कारची तीन वाहनांना धडक

Chanakya Niti: न लढता शत्रूला हरवायचंय? मग चाणक्यांच्या या 7 गोष्टी ठेवा लक्षात

राजकारणाचा विचका झालाय; राष्ट्रवादीचा अध्यक्ष 'पाटील' असावा, पटेल नाही, सुनेत्रा पवारांनी शपथ घेताच राज ठाकरेंची पोस्ट

Shocking : लग्नाच्या २८ व्या दिवशी बायको २ महिन्यांची गरोदर; अल्ट्रासाऊंड रिपोर्ट बघितला अन् नवऱ्याला शॉकच बसला

Horoscope Sunday: पैसा खर्च होईल, ५ राशींना आरोग्याकडे द्यावे लागेल लक्ष, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT