विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची ‌पंढरपुरात गर्दी  Saam tv
महाराष्ट्र

विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची ‌पंढरपुरात गर्दी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत नागणे

पंढरपूर : योगिनी एकादशी (Yogini Ekadashi) निमित्ताने पंढरपूरनगरी (Pandharpur) वारकऱ्यांनी (Warkari) गजबजली आहे. आषाढी एकादशी (Aashadhi Ekdashi) काळात पंढरपुरात संचारबंदी असल्याने आत्ताच भाविक पंढरपुरात येऊन कळस दर्शन करून परत जात आहेत. आज पंधरा दिवसांची एकादशी आहे. यामुळे आज पंढरपूरमध्ये विठुनामाच्या गजर सुरू आहे. बऱ्याच दिवसानंतर चंद्रभागा नदी, प्रदक्षिणा मार्ग, संत नामदेव पायरी, महाद्वार या ठिकाणी भाविकांची लगबग होती. प्रासादिक वस्तू विक्रीची दुकानात भाविक वस्तू खरेदी करुन परतत आहेत. आषाढी एकादशी पूर्वीच भाविकांनी आज पंढरीत येऊन कळस आणि संत नामदेव महाराज पायरी चे दर्शन घेऊन धन्यता मनाली आहे. (Crowd of Warakaris in Pandharpur to pay homage to Vithuraya)

दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात (Pandharpur) भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाचा (Corona Virus) संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने पंढरपुरात बाहेर गावाहून येणा-या भाविकांची कोरोना चाचणी मोहिम हाती घेतली आहे. शहराकडे येणाऱ्या प्रमुख मार्गावर १४ ठिकाणी एन्टिंजेन (Antigen Test) कोरोना चाचणी कॅम्प सुरू करण्यात आलं आहे.

दिवसभर कोरोना तपासणी केली. या तपासणी मध्ये पंढरपुरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या सुमारे ५८६ लोकांची कोरोना चाचणी Test करण्यात आली आहे. यामध्ये ३७ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले आहे. ही कोरोना चाचणी मोहिम आषाढी वारी पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे, प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आषाढी वारीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या पालख्या व पालख्यांसोबत येणारे वारकरी पालखीतळावर आल्यानंतर त्याठिकाणाहून पंढरपूरकडे येईपर्यंत, एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत काय काळजी घ्यायची यासंदर्भातील सूचना अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT