Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

How to Remove Smell From Shoes : बुटांचा खराब वास निघून जावा यासाठी आम्ही काही खास टिप्स शोधल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही स्मेल फ्री बुटं वापरू शकता.
How to Remove Smell From Shoes
Smell Free Shoes TipsSaam TV
Published On

पावसाळा सुरू झाला की पाय पाण्याने भिजतात. त्यामुळे बुटांचा वास येण्यास सुरुवात होते. बुटांचा खराब वास पायांना देखील लागतो. त्यामुळे बुट काढून ठेवल्यानंतर सुद्धा पायांचा खराब वास येत राहतो. काही व्यक्तींना भरपूर घाम येतो. घाम जास्त आल्याने देखील बुटांमध्ये तो मुरतो आणि खराब वास येऊ लागतो. खराब वास येऊ नये म्हणून काही व्यक्ती महागडे स्प्रे सुद्धा वापरतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला हा बुटांचा असा वास येऊ नये म्हणून काय उपाय केला पाहिजे याची माहिती सांगणार आहोत.

लिंबू आणि संत्रीच्या साली

तुमच्या बुटांचा अतिशय खराब वास येत असेल तर पायात बुट घालताना त्यामध्ये संत्री किंवा लिंबाची साल टाकून ठेवा. असे केल्याने बुटांचा अजिबात खराब वास येणार नाही आणि पायांना देखील हा वास लागणार नाही. तुम्ही संत्री किंवा लिंबू खाल्ल्यानंतर त्याच्या साली बुटांच्या रॅकमध्ये सुद्धा टाकून ठेवू शकता.

How to Remove Smell From Shoes
World Most Expensive Shoes: हे आहेत जगातील सर्वात महागडे शूज, किंमत ऐकून व्हाल थक्क!

टी बॅग

बुटांचा वास जाण्यासाठी तुम्ही टी बॅगचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला नवीन चांगली टी बॅगची गरज नाही. चहा बनवण्यासाठी वापरलेला टी बॅग सुद्धा तुम्ही बुटांमध्ये ठेवू शकता. असे करताना फक्त एक काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे टी बॅग आधी फॅनच्या हवेवर सुकवून घ्या त्यातील सर्व पानी सुकून जाईल अशा ठिकाणी ही टी बॅग ठेवा. त्यानंतर टी बॅग बुटांमध्ये ठेवून घ्या.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बुटांचा अजिबात वास येऊ नये म्हणून तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. त्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याचा गोळा किंवा मिश्रण चपलांच्या रॅक जवळ ठेवा. त्यासह तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र एका स्प्रे बॉटलमध्ये भरून बुटांवर स्प्रे करू शकता.

बुटं उन्हात वाळवा

बुटाचा वास पूर्णता निघून जावा यासाठी बुटं उन्हामध्ये सुकवून घ्या. बुटं उन्हात सुकवली की त्यातील ओलावा पूर्णता निघून जातो आणि बुटांचा वास येणे बंद होते. त्यामुळे तुम्ही बुटांसाठी या काही सिंपल ट्रिक्स ट्राय करू शकता.

How to Remove Smell From Shoes
World Most Expensive Shoes: हे आहेत जगातील सर्वात महागडे शूज, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com