Priya More
वेगवेगळे स्टायलिश शूज घालायला प्रत्येकाला आवडते. पण या शूजची साधारण किंमत लाखांच्या घरात असू शकते.
जगामध्ये अनेक महागडे शूज आहेत. त्याची किंमत जर माहिती पडली तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
सॉलिड गोल्ड OVO x Air Jordans शूजची किंमत 16 कोटी रुपये आहे. हे शूज अमेरिकन पॉप स्टार ड्रेकच्या मालकीचे आहेत.
2008 मध्ये ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये कान्ये वेस्टने परिधान केलेले हे नाइकेचे एअर इझी सॅम्पल शूज आहेत. हे शूज 14.76 कोटी रुपयांना विकले गेले.
माइक जॉर्डनचे हे शूज 12 कोटी रुपयांना विकले गेले होते. या शूजची विक्री एका लिलावादरम्यान झाली होती.
1985 मध्ये एका क्रीडा प्रदर्शनादरम्यान शिकागो बुल्स स्टारने घातलेले हे शूज आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये ऑनलाइन लिलावात हे शूज 5 कोटी रुपयांना विकले गेले.
नाइके एअर जॉर्डन 1 ची 2020 मध्ये विक्री $0.5 दशलक्षपेक्षा जास्त किमतीत करण्यात आली होती. जॉर्डनने स्वाक्षरी केलेले हे शूज 1985 च्या गेममध्ये परिधान केले होते.
मायकल जॉर्डनच्या एअर जॉर्डन 11 'स्पेस जॅम' या शूजचा नमुना जुलै 2021 मध्ये सोथबीजने लिलावात $176,400 मध्ये विकला गेला. 1996 च्या स्पेस जॅम चित्रपटात मायकेल जॉर्डनला घालण्यासाठी हे शूज तयार केले होते.