Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

Mahavikas Aaghadi : काँग्रेसच्या जागा वाढल्या यात आमचा वाटा आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला असल्याने आता मविआमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेले वाद समोर आले आहेत.

मविआतील सर्वच पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस काही एकट्याने निवडणूक लढणार नाही. काँग्रेसच्या जागा वाढल्या यात आमचा वाटा आहे, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस नेत्यांना दिला आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेले वाद समोर आले आहेत.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील' असं म्हंटलं आहे. राज्यात स्थापन होणाऱ्या तिसऱ्या आघाडीविषयी बोलताना, 'महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे, मात्र महाविकास आघाडीची मत कमी करण्यासाठी ही तिसरी आघाडी बनवण्याचे धोरण आहे. तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी असते. तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com