आमदार पुत्रांच्या लग्नाला नागरिकांसह आमदार खासदारांची तोबा गर्दी विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

आमदार पुत्रांच्या लग्नाला नागरिकांसह आमदार खासदारांची तोबा गर्दी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona sencond wave) अद्याप सुरुच आहे. अजूनही रुग्ण वाढत आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona sencond wave) अद्याप सुरुच आहे. अजूनही रुग्ण वाढत आहेत. अशात तिसऱ्या लाटेची शक्यता देखील तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात अद्याप ही कोरोना निर्बंध कायम आहेत. सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) देखील संध्याकाळी चार नंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सगळ्या नियमांना खुद्द लोकप्रतिनिधींची धाब्यावर बसवले आहे.

बार्शी विधानसभेचे (Barshi) आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांच्या दोन्ही मुलांचे लग्न काल बार्शीतमध्ये पार पडले. लक्ष्मी सोपान बाजार समितीचे चेअरमन आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणजित राऊत यांचा तसेच त्यांचे बंधू रणवीर राऊत यांचा विवाह सोहळा परवा दि. 25 जुलै रोजी संध्याकाळी 6.45 मी. गोरज मुहुर्तावर पार पडला. अंत्यत थाटामाटात झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी हजरोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंन्सचा पुरता फज्जा या लग्न सोहळ्यात उडालेला होता.

विशेष म्हणजे आमदार राजेंद्र राऊत हे भाजप समर्थक असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. भाजप आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार नितेश राणे, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार रणजित मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक अनेक नेते या लग्नाला उपस्थित होते.

एकीकडे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीष महाजन यांच्यासारखे नेते पूरग्रस्त भागात जाऊन लोकांचे अश्रू पुसण्याचे काम करत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र लग्न सोहळ्यात उपस्थिती लावत आहेत. दरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या या लग्ण सोहळ्याच्या प्रकरणात बार्शी शहर पोलिसांत गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.

योगेश मारुती पवार यांच्या विरोधात बार्शी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. योगेश पवार यांनी ह्या लग्न सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी बार्शी पोलिसात अर्ज केलेला होता. फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास हरकत नसल्याची लेखी समज पोलिसांनी योगेश पवार यांना दिली होती. परंतू प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येने लोक या लग्न सोहळ्यास हजर राहिल्याने पोलिसांनी केवळ योगेश पवार यांच्याच विरोधात आय़ोजक म्हणून गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लग्नात वेगळा न्याय आणि आमदारांच्या मुलांच्या लग्नात वेगळा न्याय असे का असा सवाल बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी उपस्थित केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT