Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

नाशकात कोट्यावधींचा भूखंड घोटाळा; २९ जणांविरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नाशिकच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीचा समावेश

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक - पुन्हा नवीन भूखंड घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ मालकांना विश्वासात न घेता बनावट कागदपत्रे आणि मूळ मालकांऐवजी दुसरीच बनावट माणसं उभी करून तब्बल २९ भूखंडांची परस्पर विक्री करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे भूखंड घोटाळा प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींमध्ये नाशिकच्या (Nashik) मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीचाही समावेश आहे.

हे देखील पाहा -

नाशिकच्या गंगापूर रोडवरील निर्मला कॉन्व्हेंट शाळे समोरील चार एकर दोन गुंठे जमिनीवरील तीस भूखंड मूळ मालकांना अंधारात ठेवत एका भागीदाराने बनावट दस्तावाद्वारे परस्पर विक्री केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिकच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीचं नाव समोर आल असून त्यांच्यासह इतर १५ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यान आरोपींना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या भूखंड घोटाळ्यात भूखंड विक्री करताना मूळ मालकांना विश्वासात न घेता प्लंबर, वॉचमन अशा बनावट व्यक्तींना मालक म्हणून उभे करत व्यवहार केला गेल्याचा आरोप तक्रारदार दिपाली शिंदे यांनी केला आहे.

या प्रकरणी सुरुवातीला पोलीस कार्यवाही करत नसल्याने शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनतर न्यायालयाने सरकारवाडा पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कार्यवाही करत 29 जणांवर भूखंड फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात मालकाच्या व्यतिरिक्त दुसरा माणूस उभा करून या भूखंडची खरेदी केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भूखंड घोटाळा प्रकरणातील आरोपींमध्ये थेट मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीचाही समावेश असल्याने या प्रकरणातल गांभीर्य वाढलं असून या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar Level: अचानक ब्लड शुगर लेव्हल कमी झाली, कारण काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

Tuesday Horoscope: नोकरी व्यवसायात काम करण्याऱ्यांवर लक्ष्मीची कृपा राहणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Mumbai News : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा; नव्या वादाचा चेंडू थेट CM फडणवीसांच्या कोर्टात

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

येमेनजवळील समुद्रात मोठी दुर्घटना; जहाजावरील LPG टँकरला भीषण आग, जहाजावर होते २३ भारतीय खलाशी

SCROLL FOR NEXT