MNS on Aditya Thackeray, Aditya Thackeray Ayodhya Visit Saam TV
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची टीका

सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरक आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे हे लखनऊ विमानतळावर दाखल होणार आहेत. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन मनसे नेत्यांनी त्यांना टोला लगावला आहे. (Aditya Thackeray Ayodhya Visit)

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन ट्वीट करत टीका केली आहे. संदीप देशपांडे ट्वीटमध्ये करत म्हणले की, आज एक जुनी गोष्ट आठवली जेंव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेले सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राजसाहेबच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरक आहे.

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून १० ते १२ हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे पोस्टर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे. शरयू तीरावर शिवसैनिकांचे जत्थे जमायला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या महाआरतीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह काही नेते आणि पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले आहेत. स्थानिक शिवसेना नेत्यांकडून आदित्य यांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे. हा दौरा राजकीय नसून श्रद्धेचा असल्याचे त्यांनी याआधी म्हटले होते. याआधी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा10 जूनला निश्चित करण्यात आला होता. पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या दौऱ्याची तारीख बदलून 15 जून करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT