मलिकांनी तोंड सांभाळून बोलावं; राजकारणात सगळेच काचेच्या घरात राहतात - चंद्रकांत पाटील Saam TV
महाराष्ट्र

मलिकांनी तोंड सांभाळून बोलावं; राजकारणात सगळेच काचेच्या घरात राहतात - चंद्रकांत पाटील

'थोडा वेळ थांबा गावागावात जेव्हा महिलांचे मोर्चे निघतील महिला हातात दगड घेवुन समोर येतील तेंव्हा समजेल वाईन समर्थन काय असते'

अभिजीत घोरमारे

गोंदिया : नवाब मलिक यांनी तोंड सांभाळून बोलावं असा सुचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना लगावला आहे. भाजपचे लोक स्वतः दारू पितात असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले असून त्याच्या याच वक्तव्यावरती चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) पलटवार केला आहे.

आपल्या स्वतःच्या नेत्यांना जर काही बोललो तर मलिकांना चालत नाही. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलावे असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी जे म्हटले ते म्हणायला पाहिजे होते कि नाही ते माहित नाही. मात्र नवाब मलिकांच्या (Nawab Malik) नेत्यांना काही म्हंटल तर त्यांना ते चालत नाही. राजकारणात प्रत्येकाचे घर काचेचे असतात त्यामुळे दगड मारताना विचार केला पाहिजे असा खोचक टोलाही पाटलांनी लगावला आहे.

आमचे कार्यकर्ते दारु पिण्यापासून दुर राहतात. तुम्ही मात्र वाईनच (Wine) समर्थन करता असल्याचे वक्तव्य त्यांनी केला आहे. थोडा वेळ थांबा गावागावात जेव्हा महिलांचे मोर्चे निघतील महिला हातात दगड घेवुन समोर येतील तेंव्हा समजेल वाईन समर्थन काय असते ते अशा सूचक इशारा ही त्यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT