Sanjay Raut/Narendra Modi
Sanjay Raut/Narendra Modi Saam TV
महाराष्ट्र

Shivsena: मोदींच्या उत्तरावर सामनामधून आगपाखड; चिखलफेकीवरून असंख्य प्रश्नांचा केला भडिमार...!

Ruchika Jadhav

Shivsena: गौतम अदाणी प्रकरणावरून विरोधकांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. गुरूवारी या मुद्द्यावरून राज्यसभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. यावर पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या टीकेला चिखल असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता त्यांनी दिलेल्या उत्तरावर पुन्हा एकदा सामनामधून टीका करण्यात आली आहे. (Latest Marathi Political News)

" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे 'चिखल' वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत मोदी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता 'गुलाल' उधळला? फक्त चिखलफेकच केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजप समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही तर काय म्हणायला हवे? अदानी प्रकरणावरील मौन हा तुम्हाला गुलाल वाटतो का? आता तुमच्यावर चिखलफेक सुरू झाली म्हणून तुम्ही 'चिखल', 'गुलाल' आणि 'कमळ' हे यमक जुळवले आहे. मात्र तुमचेही पाय 'चिखलामध्येच आहेत हे 'गमक' विसरू नये. तुम्ही विसरलात तरी जनता त्याची आठवण करून देईलच !", अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

पुढे विरोधकांवर मोदींनी केलेल्या टीकेवर लिहिले आहे की, " मतभिन्नता आणि विचारभिन्नता असली तरी चिखलाने माखलेली टीका क्वचितच होत असे. आता काय चित्र आहे? मागील सात-आठ वर्षांत तर राजकीय विरोधक म्हणजे शत्रू, सरकारचे टीकाकार म्हणजे देशद्रोही असे एक 'नरेटिव्ह' तयार केले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे 'चिखल' वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता 'गुलाल' उधळला? फक्त चिखलफेकच निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजप समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही तर काय म्हणायचे? गुरुवारच्या राज्यसभेतील भाषणातही पंतप्रधान मोदी यांनी 'नेहरू जर महान होते, तर त्यांच्या वारसांना नेहरू आडनाव लावण्यात लाज कसली?' अशी टीका केली तो 'गुलाल' होता असे पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला म्हणायचे आहे का?

विरोधक जी टीका करत आहेत त्यावर मोदींनी हिंदी शायरीमध्ये उत्तर दिले.यावेळी ते म्हणाले की, विरोधक जेवढी चिखलफेक करतील तेवढेच कमळ फुलत राहील. त्यावर सामनात लिहिले आहे की, " अदानी प्रकरणावरील मौन हा तुम्हाला गुलाल वाटत असेल तर काय बोलायचे? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय विरोधकांची जी मुस्कटदाबी मागील सहा-सात वर्षांत होत आहे, इतर पक्षांना संपविण्याचे जे राक्षसी उद्योग केले जात आहेत तो तुमच्या हातात चिखल असल्याचाच पुरावा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT