महाराष्ट्र

Nagpur criminal parade : नागपूर पोलिसांचा 'पुणे पॅटर्न', गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी नवे पोलीस आयुक्त सज्ज

Nagpur Police News : नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयात 317 गुंडांची परेड करण्यात आली. पुढे कुठलाही गुन्हा केल्यास परिणामांना सामोरे जाण्याची इशारा पोलीस आयुक्तांनी यावेळी गुन्हेगारांना दिला.

प्रविण वाकचौरे

पराग ढोबळे

Nagpur News :

पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पुणे क्राईम ब्रान्चने २६७ गुन्हेगांराची परेड काढत त्यांना सज्जड दमही दिला. पुणे पोलिसांच्या पावलावर पाऊल टाकत आता नागपूर पोलीसही पुढे सरसावले आहे.

नागपुरातील गुन्हेगारी समुळ नष्ट करण्यासाठी आता नवे आयुक्त रवींद्र सिंगल यांनी प्रयत्न सुरु केला आहेत. त्यासाठी पहिलं पाऊल म्हणून पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळताच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शहरातील शेकडो गुंडांना समज दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयात 317 गुंडांची परेड करण्यात आली. पुढे कुठलाही गुन्हा केल्यास परिणामांना सामोरे जाण्याची इशारा पोलीस आयुक्तांनी यावेळी गुन्हेगारांना दिला. सुमारे साडेतीन तास ही परेड चालली. (Latest Crime News)

सर्व पोलीस ठाण्यातील 2008 पासूनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एकत्र बोलावून त्यांची परेड करण्यात आली. खून, खंडणी, मकोका, एमपीडीए, तडीपारीच्या गुन्हेगारांचाही यामध्ये समावेश होता. आता नागपुरातील या 'पुणे पॅटर्न'चा गुन्हेगारांवर किती परिणाम होतो आणि नागपुरातील गुन्हेगारी कमी होण्यास किती मदत होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

पुणे पोलीस अॅक्शनमोडमध्ये

पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून लवकरच क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट होणार आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.

पुण्यातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे.

कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा नेमका इशारा काय?

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील तर निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Gold Ring : हातांचे सौंदर्य वाढवतील सोन्याच्या अंगठ्यांचे 'हे' ५ ट्रेंडी डिझाईन्स; पाहा लेटेस्ट कलेक्शन

Rahul Gandhi: “एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही”; राहुल गांधींची संतप्त पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

पुणे शिक्षक निवडणुकीवरून महायुतीत घमासान; फडणवीस-शिंदेमध्ये कोल्डवॉर, वडेट्टीवारांचा दावा

SCROLL FOR NEXT