Crime News
Crime News 
महाराष्ट्र

आक्रितच! लाख रूपयांना दिवसाला हजार रूपये व्याज!

साम टीव्ही ब्युरो

नीलेश दिवटे

कर्जत : सावकारी पाशातून कर्जत मुक्त होताना दिसत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या धडक कारवाईमुळे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. एक लाखाच्या रकमेवर दिवसाला एक हजार व्याज घेणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोलिसांत अवैध सावकारकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या सावकाराने व्याजापोटी कोरे धनादेश आणि स्विफ्ट कारचीही नोटरी करून घेतली होती हे विशेष. (Crimes against lenders charging excess interest)

येथील पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने संदीप कळसकर यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडुन ऑक्टोबर २०२० रोजी व्याजाने २ लाख रुपये घेतले होते. मात्र, त्या व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन १ हजार रुपये असा होता. त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी कळसकर यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये घेतले.

या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते.त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रवाढ रक्कम लावल्याने मुद्दलची रक्कमही ६ लाख रुपयांवर गेली. फिर्यादीने व्याजापोटी ३ लाख रुपये दिले. ३ लाखांची रक्कम देऊनही ९ लाख रुपये आणखी द्यावे लागतील, असे आरोपीने त्यास धमकावले. आरोपी हे पैसे वसूल करण्यासाठी गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ करत होता. त्याने फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून २ कोरे धनादेशही घेतले होते.

'माझी सध्या पैसे देण्याची परीस्थिती नाही, माझे व्याज माफ करा, मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो' अशी विनंती फिर्यादी कळसकर यांनी केली. मात्र, आरोपीने काहीही ऐकले नाही. आरोपीच्या त्रासामुळे फिर्यादीची मानसिक स्थिती खराब झाली होती. त्यानुसार संदीप कळसकर यांच्या फिर्यादीवरून अवैद्य सावकारकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे हे करीत आहेत.

मी आत्महत्याच करणार होतो

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या अवैध सावकारीविरुद्ध मोहिमेने गोरगरीब, सर्वसामान्यांची होणारी लूट थांबली आहे. ते देवदूत आहेत. दररोज दमदाटी आणि होणाऱ्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपविण्याचे विचार मनात यायचे. पोलीस निरीक्षक यादव व पोलिसांनी मला जीवन प्रवाहात पुन्हा आणले. (Crimes against lenders charging excess interest)

- संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव), फिर्यादी, कर्जत.

कुणीही अवैध सावकारकी करून कोणत्याही नागरिकाला वसुलीसाठी वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ करणे, वस्तू उचलून नेणे अगर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल, तर याद राखा. सावकाराकडून असा कोणताही प्रकार होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा. कोणत्याही तक्रारदारास सावकाराकडून कसलाही त्रास होणार नाही याची पोलीस काळजी घेतील.

-चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक,कर्जत.

Edited By -Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

Today's Marathi News Live : मोठी बातमी! वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचा राजीनामा

Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

SCROLL FOR NEXT