Paithan Saam
महाराष्ट्र

Crime Patrol: क्राइम पेट्रोलचं वारं अंगात आलं; सख्ख्या चुलत्याचा काढला काटा, शीर वेगळं करून फेकलं विहिरीत

Land Dispute Turns Deadly: केवळ जमीन न परत दिल्याच्या रागातून दोन पुतण्यांनी आपल्या चुलत्याचा क्राईम पेट्रोल मालिकेच्या पद्धतीने निर्घृण हत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

माणुसकिला काळिमा फासणारी घटना पैठण तालुक्यातून समोर येत आहे. जमीनीच्या वादातून दोन पुतण्यांनी आपल्याच चुलत्याचा काटा काढला आहे. क्राईम पेट्रोलसारख्या मालिकेवरून प्रेरणा घेऊन दोन्ही पुतण्यांनी चुलत्याची निघृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही धक्कादायक पैठण तालुक्यातील चिंचोळा गावात घडली आहे. नामदेव एकनाथराव ब्रह्मराक्षस (वय ६०) असं मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई न्यायालयात लिपिक पदावर नोकरी केली होती. दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यावर ते चिंचोळा येथे स्थायिक झाले होते. तर, बाबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस (३३) आणि आबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस (३०) असे दोन आरोपींची नावे आहेत.

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

९ मे रोजी रात्री झोपेत असलेल्या नामदेव ब्रह्मराक्षस यांना आरोपींनी "चोर शिरला आहे" असं सांगून जागं केलं. त्यांना शेतात गट नं. १२१ मधील विहिरीकडे नेण्यात आलं. त्याठिकाणी एका पुतण्याने गळा आवळला आणि दुसऱ्याने कोयत्याने शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत नामदेव यांनी काही वर्षांपूर्वी आरोपींच्या वडिलांकडून दीड एकर शेती विकत घेतली होती. मात्र, ती परत देण्यास त्यांनी नकार दिला. या प्रकरणावरून पुतण्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यांनी काकाचा काटा काढायचं ठरवलं. त्यांनी ‘क्राईम पेट्रोल’ पाहून खूनाचा कट रचला.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच दोघा आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: डेटा कधीही संपणार नाही! Jioचा धमाकेदार २०० दिवसांचा Unlimited 5G प्लॅन

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात, २ जणांचा मृत्यू

Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवॉर! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CTTV व्हिडिओ समोर

माजी मंत्र्यांच्या नातवाचा पाय खोलात; भाजप नेत्याकडून पैसे थकवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

SCROLL FOR NEXT