Crime Scene saam tv
महाराष्ट्र

Washim Crime News: पैशांपुढे नातं हरलं! पैसे न दिल्याने मुलाकडून वृद्ध वडिलांची हत्या

Washim Crime News: संजय आत्माराम मुंढे असं या आरोपी मुलाचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

Washim News : पैशांसाठी मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पिंपरखेड येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला याप्रकरणी अटक केली आहे.

संजय आत्माराम मुंढे असं या आरोपी मुलाचे नाव आहे. तर आत्माराम धोंडू मुंढे (वय 70 वर्ष) असं मृत वडिलांचे नाव आहे. याबाबत मृतकाचा भाऊ रामकिसन मुंढे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

रामकिसन मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ आत्माराम हे गेल्या दहा वर्षांपासून रिसोड तालुक्यातील पिंपरखेड, वाडी वाकद, वाकद,बोरखेडी येथील भगवानबाबा संस्थानमध्ये पूजाअर्चा करत होते. मृताचा मुलगा संजय हा वडिलांकडे नेहमी पैशाची मागणी करत होता.  (Crime News)

पैशाची मागणी पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. 15 मे रोजी पुन्हा पिता-पुत्रांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. मात्र, मृताच्या बहिणीने संजयची समजूत घातल्यानंतर त्याला तेथून काढून दिले होते. (Latest Marathi News)

मात्र पैसे न दिल्याचा राग मनात ठेऊन संजयने 15 मे रोजी रात्री धारदार शस्त्राने वडिलांची निर्दयीपणे हत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आरोपी संजय मुंढे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जागेचा वाद टोकाला! महिलेच्या झिंज्या धरत तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; घटनेचा VIDEO व्हायरल

Raanjhanaa : सोनम कपूरचा 'रांझणा' पुन्हा प्रदर्शित होणार; AIनं चक्क क्लायमॅक्स बदलला, रिलीज डेट काय?

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

JioPC: टीव्हीला संगणक बनवा JioPC च्या किफायतशीर प्लॅनसह, फक्त ५९९ रुपयांत

SCROLL FOR NEXT