Mumbai Crime News: आरोपींनी डोकं लावलं पण अधिकाऱ्यांनी विमातळावर अडवलं; DRIने 2.23 कोटींचं सोनं केलं जप्त

Mumbai Crime News: दुबईवरून आलेल्या दोन प्रवाशांना अटक महसूल विभागाने अटक केली.
Gold
GoldSaam Tv

Mumbai Crime News : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून साडेतीन किलोची सोन्याची पावडर जप्त केली आहे.

प्लास्टिकच्या पाऊचमध्ये लपवून हे २.२३ कोटी रुपयांचे सोनं आरोपींनी आणलं होतं. गुप्त माहितीच्या आधारे दुबईवरून आलेल्या प्रवाशांना अटक महसूल विभागाने अटक केली.

Gold
Mumbai Crime News : आई अन् मुलीला बघून करायचा अश्लील चाळे, ५९ वर्षीय नराधमाचं कृत्य असं झालं उघड

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय प्रवाशांच्या मदतीने भारतात सोन्याची तस्करी करण्यात येत होती. गुप्त माहिती मिळाल्यानंतर DRI अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती. (Crime News)

एमिरेट्स फ्लाइट EK 500 ने 15 मे 2023 रोजी दुबईहून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांना महसूल विभागाने अडवले होते. दोन्ही प्रवाशांची तपासणी आणि झडती घेतली असता त्यांच्याकडे पावडरच्या स्वरूपातील सोनं आढळलं.

Gold
Mumbai News: पार्किंगच्या वादात एअर गन दाखवत धमकावले, घटनेचा धक्कादायक Video व्हायरल; आरोपीला अटक

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपींनी पेस्ट स्वरूपात एकूण 3535 ग्रॅम सोने चार प्लास्टिकच्या पाऊचमध्ये लपवले होते, जे काळ्या टेपने गुंडाळले होते. अधिक तपास केला असता दोघेही दुबईतून कार्यरत असलेल्या एकाच सिंडिकेटचे भाग असल्याचे उघड झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com